रविवारी (११ जुलै) भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात दुसरा टी-२० सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने जोरदार पुनरागमन करत इंग्लंड संघावर ८ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंड संघाची कर्णधार हिथर नाईट आगळ्यावेगळ्या प्रकारे बाद झाल्याचे पहायला मिळाले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अनोख्या प्रकारे झाली धाबबाद
दुसऱ्या डावात इंग्लंड संघ फलंदाजी करत असताना दीप्ती शर्मा १४ व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आली होती. या षटकातील ५व्या चेंडूवर फलंदाज एमी जोन्सने सरळ दिशेने चेडूंने खेळला होता. हे पाहून नॉन स्ट्राइकला फलंदाजी करत असलेली हिथर नाईट ही धाव घेण्यासाठी क्रिजच्या बाहेर आली होती. तिने पुन्हा मागे जाण्याच्या प्रयत्न केला. परंतु नेमका तेव्हाच चेंडू दीप्ती शर्माच्या पायाला लागला आणि थेट यष्टीला जाऊन धडकला. (Ind W vs Eng W Heather knight run out by deepti Sharma)
त्यानंतर पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला होता. तिसऱ्या पंचांनी हिथर नाईट धाबबाद असल्याचे घोषित केले. अशाप्रकारे दिप्ती शर्माने चेंडूला हातही न लावता इंग्लंडची कर्णधार हिथर नाईटला धावबाद केले. ती २८ चेंडूत ३० धावांची खेळी करत माघारी परतली.
https://youtu.be/k8m3ZnnZ4os
भारतीय संघाने केल्या होत्या १४८ धावा
या सामन्यात इंग्लंड महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाकडून शेफाली वर्माने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. यादरम्यान तिने ८ चौकार आणि १ षटकार लगावला होता. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौरने ३१ धावांची खेळी केली. २० षटकअखेर भारतीय महिला संघाला ४ गडी बाद १४८ धावा करण्यात यश आले होते.
भारतीय संघाने मिळवला ८ धावांनी विजय
भारतीय संघाने दिलेल्या १४९ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड महिला संघाकडून सलामी फलंदाज तामसिन ब्यूमॉन्टने ५९ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ७ चौकार लगावले होते. तसेच कर्णधार हिथर नाईटने ३० धावांचे योगदान दिले होते. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे इंग्लंड संघाला २० षटकअखेर ८ बाद १४० धावा करण्यात यश आले. हा सामना भारतीय महिला संघाने ८ धावांनी जिंकत मालिका १-१ ने बरोबरीत आणली.
महत्वाच्या बातम्या:
क्या बात! क्रिकेट खेळून देशसेवा केल्यानंतर, आता ‘हा’ क्रिकेटपटू बनलाय आर्मीमध्ये मेजर
‘गुरुजी इतरांकडून चँपियन बनण्याचे धडे घेतायत’; विम्बल्डन फायनल पाहायला गेलेले शास्त्री झाले ट्रोल
हिशोब बरोबर! शेफालीने घेतला सूड, शून्यावर बाद करणाऱ्या इंग्लिश गोलंदाजाला मारले सलग ५ चौकार