---Advertisement---

हिशोब बरोबर! शेफालीने घेतला सूड, शून्यावर बाद करणाऱ्या इंग्लिश गोलंदाजाला मारले सलग ५ चौकार

On: सोमवार, जुलै 12, 2021 8:31 AM
---Advertisement---

भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांमध्ये रविवारी (११ जुलै ) दुसरा टी-२० सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने जोरदार पुनरागमन केले. या सामन्यात भारतीय महिला संघाला ८ धावांनी विजय मिळवण्यात यश आले. या विजयासह ही मालिका १-१ ने बरोबरीत आली आहे. दरम्यान भारतीय महिला संघातील विस्फोटक फलंदाज शेफाली वर्माने या सामन्यातील एकाच षटकात सलग ५ चौकार मारण्याचा पराक्रम केला आहे.

या सामन्यात इंग्लंड महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय महिला संघाकडून शेफाली वर्माने तुफान फटकेबाजी केल्याचे दिसून आले. (Shefali verma hits back to back five boundries in katherin brunt over watch video)

एकाच षटकात लगावले सलग पाच चौकार
इंग्लंड संघाकडून चौथे षटक टाकण्यासाठी कॅथरीन ब्रंट आली होती. या षटकातील पहिला चेंडू स्म्रिती मंधानाने खेळला. तिने एक धाव घेत स्ट्राइक शेफाली वर्माला दिली होती. त्यानंतर पुढील ५ चेंडूवर तिने सलग ५ चौकार मारण्याचा पराक्रम केला. तिने पहिला चौकार मिड विकेटच्या दिशेने लगावला होता. तर पुढील चेंडूवर तिने गोलंदाजाच्या वरून सरळ चौकार लगावला होता. तसेच चौथ्या चेंडूवर तिने पॉइंटच्या दिशेने चौकार मारला. पाचव्या चेंडूवर तिने लाँग ऑनच्या वरून चौकार ठोकला. तसेच शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर तिने मिड ऑनच्या दिशेने चौकार लगावत एकाच षटकात सलग ५ चौकार मारण्याचा कारनामा केला.

शेफाली वर्माने या सामन्यात ३८ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ८ चौकार आणि १ षटकार मारला. मुख्य बाब अशी की, गेल्या सामन्यात कॅथरीनने शेफाली वर्माला शून्यावर बाद केले होते. मात्र या सामन्यात ताबडतोड फलंदाजी करत तिने कॅथरीनला चांगलेच प्रत्त्युत्तर दिले आहे. इंग्लंड संघाने पाहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तू गोलंदाजी करतोय की भिक मागतोय?’, त्यावेळी सेहवागने फलंदाजी करतानाच शोएब अख्तरला केले होते गपगार

क्या बात!! भारतीय वंशाच्या अमेरिकन टेनिसपटू समीर बॅनर्जीने पटकावले विम्बल्डन ज्युनियरचे जेतेपद

“कोणीतरी येणार येणार गं!” क्विंटन डी कॉक कुटुंबात होणार नवीन सदस्याचे आगमन, ‘अशी’ पोस्ट करत दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---