भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा आपल्या तुफानी फटकेबाजीसाठी ओळखला जायचा आणि पाकिस्तान संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर हा आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जायचा. सेहवागने आपल्या कारकीर्दीत अनेक अश्या अप्रतिम खेळ्या खेळल्या आहेत. परंतु मुलतानमध्ये खेळलेली ३०९ धावांची खेळी अजूनही सर्वांना आठवण असेल.
मुलतानमध्ये रंगलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामन्यात वीरेंद्र सेहवागने ३७५ चेंडूत ३०९ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने पाकिस्तान गोलंदाजांचा घाम काढला होता. सेहवागनं जेव्हा २०० धावांचा पल्ला गाठला होता, तेव्हा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एका पाठोपाठ एक बाऊन्सर मारायला सुरुवात केली होती. परंतु सेहवागने त्या चेंडूवर प्रहार न करता, ते चेंडू तो सोडत होता.(Tum bowling kar rahe ho ya bheek mang rahe ho when Virender Sehwag sledged shoaib akhtar)
सेहवागच्या या खेळीबद्दल भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरांनी एक खुसाला केला आहे. त्यांनी सांगितले की,”शोएब अख्तर एका पाठोपाठ एक बाऊन्सर चेंडू टाकत होता. सेहवागला उकसवण्यासाठी शोएब अख्तरने म्हटले होते की, ‘तू २०० धावा केल्या आहेत, मी तुझ्यासमोर इतके बाऊन्सर चेंडू टाकतोय, कमीत कमी एक पुल शॉट तरी मार.’ त्यानंतर सेहवागने त्याच्याकडे पाहून म्हटले की,’तू गोलंदाजी करतोय की भिक मागतोय?”
वीरेंद्र सेहवाग कसोटी क्रिकेटमध्ये एकमेव भारतीय फलंदाज आहे, ज्याने फलंदाजी करताना २ तिहेरी शतक झळकावले आहेत. हा कारनामा पहिल्यांदा त्याने २००४ साली पाकिस्तान संघाविरुद्ध केला होता. तसेच दुसरे तिहेरी शतक त्याने २००८ मध्ये चेन्नईच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झळकावले होते.
वीरेंद्र सेहवागने कसोटी कारकिर्दीत एकूण १०४ सामने खेळले होते. यामध्ये त्यानी ४९.३ च्या सरासरीने ८५८६ धावा केल्या आहेत. तसेच त्याने २३ अर्धशतक आणि ३२ अर्धशतक झळकावले होते.
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर ‘मास्टर-ब्लास्टर’ सचिन स्वयंपाक घरात आजमावतोय हात, पाहा व्हिडिओ
‘या’ माजी खेळाडूंना मिळाली बंगाल क्रिकेटच्या कोचिंग स्टाफमध्ये संधी, व्हीव्हीएस लक्ष्मणचाही समावेश
ब्रदरली चॅलेंज! जेव्हा पंड्या बंधू जीममध्ये देतात एकमेकांना आव्हान, पाहा काय लागला निकाल