रविवारी (०६ मार्च) भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात बे ओव्हल स्टेडियमवर आयसीसी महिला विश्वचषक २०२२ मधील (ICC Women World Cup) चौथा सामना पार पडला. हा उभय संघांचा हंगामातील पहिलाच सामना होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १३७ धावांवरच गारद झाला आणि भारताने १०७ धावांच्या फरकाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. या सामन्यादरम्यान झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिने पाकिस्तानच्या सलामीवीराला बाद करण्यासाठी टाकलेला चेंडू सामन्याचे विशेष आकर्षण राहिला.
भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झूलनने या सामन्यात १० षटके गोलंदाजी करताना १ मेडन टाकत आणि २६ धावा देत २ विकेट्स घेतल्या. पूर्ण सामन्यादरम्यान तिची गोलंदाजी अप्रतिम राहिली. खासकरून तिने पाकिस्तानची सलामीवीर सिद्रा अमीन (Sidra Ameen) हिला यष्टीरक्षक फलंदाजाच्या हातून झेलबाद करण्यासाठी जो चेंडू टाकला होता, तो पाहण्यासारखा होता.
झूलनने सिद्राला ज्या चेंडूवर बाद केले, तो चेंडू मैदानावर टप्पा खाल्ल्यानंतर पलटी घेऊन ऑफ स्टंप्सच्या बाहेरच्या दिशेने गेला. तिच्या या चेंडूवर पाकिस्तानी फलंदाज सिद्रा गोंधळली. याच कारणामुळे चेंडू तिच्या बॅटला स्पर्श करत सरळ मागे यष्टीरक्षक रिचा घोषच्या हातात गेला. झूलनच्या चकवणाऱ्या चेंडूवर बाद झाल्यानंतर सिद्राची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती. तिला आपली विकेट गेल्याचे फार वाईट वाटले. कारण ती पव्हेलियनला परतताना खूप निराश दिसली.
सिद्रा ६४ चेंडूंवर ३ चौकारांच्या मदतीने ३० धावा करत झेलबाद झाली. झूलनच्या या कमालीच्या गोलंदाजीचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/CawJZyclamt/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान या सामन्यात भारतीय गोलंदाजांचे प्रदर्शन समाधानकारक राहिले. झूलनच्या २ विकेट्सव्यतिरिक्त स्नेह राना हिनेही २ विकेट्स घेतल्या. ९ षटके गोलंदाजी करताना २७ धावा देत २ विकेट्सची कामगिरी केली. तसेच राजेश्वरी गायकवाड ही भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज ठरली. तिने १० षटकांमध्ये ३१ धावा देत पाकिस्तानच्या ४ फलंदाजांना बाद केले. तसेच मेघना सिंग आणि दिप्ती शर्मा यांनीही प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
जड्डू ऑन फायर! एकाच कसोटीत दीडशेपेक्षा जास्त धावा आणि ९ विकेट्स घेणारा बनला देशातील पहिलाच खेळाडू
आधी संघाला बनवलं विश्वविजेता अन् आता रणजीमध्ये धूलने केला कहर कारनामा; अवघ्या ३ सामन्यात ठोकलं शतक
कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित सुपर-डुपर हिट, एका डावाने मॅच जिंकत केला मोठा रेकॉर्ड