भारताच्या १९ वर्षाखालील विश्वचषकाचा कर्णधार यश धूलची (Yash Dhull) रणजी ट्राॅफीमध्ये (Ranji Trophy) धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. रणजी ट्राॅफीचा गट एचचा सामना शेवटच्या आणि चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी (६ मार्च) दिल्ली आणि (Delhi vs Chhattisgarh) यांच्यात पार पडला. छत्तीसगडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात यशने शतक झळकावले आहे. त्याचे रणजी ट्राॅफीच्या या हंगामातील तिसरे शतक आहे. याअगोदर त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात म्हणजेच तमिळनाडूविरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावात शतक झळकवले होते. यशच्या शानदार शतकाच्या जोरावर दिल्लीने दुसऱ्या डावाची सुरूवात धमाकेदार केली.
पहिल्या डावात छत्तीसगड संघाने प्रथम फलंदाजी करताना आपला पहिला डाव ९ विकेट आणि ४८२ धावांवर घोषित केला होता. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघ २९५ धावांवरच सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात यश धूल आणि ध्रुव शौरी या जोडीने संघाला शानदार सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी संघाला पहिल्या विकेटसाठी २४६ धावांची भागिदारी रचली होती. त्याने दुसऱ्या डावात २६१ चेंडूत २६ चौकारांच्या मदतीने नाबाद २०० धावा केल्या.
ध्रुव शौरीने २०८ चेंडूत १३ चौकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. त्याला सुमित रुइकरने बाद केले. या अगोदर धूलने रणजी ट्राॅफीच्या पदार्पणाच्या सामन्यात तमिळनाडूविरुद्धच्या पहिल्या डावात ११३ आणि दुसऱ्या डावात ११३ धावा केल्या होत्या. झारखंडविरुद्ध आपल्या दूसऱ्या सामन्यात त्याने ५ आणि १९ धावा केल्या. छत्तीसगडविरुद्धच्या पहिल्या डावात यशने ४५ चेंडूत २९ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने ५ चौकार लगावले होते.
यावर्षीच्या रणजी हंगामात दिल्ली संघ काही विशेष कामगिरी करू शकला नाही. या सामन्यापूर्वी दिल्लीने २ सामने खेळले आहेत. त्यामधील एका सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला, तर एक सामना अनिर्णित राहिला. यश धूलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला आहे. यश धूलला आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने विकत घेतले आहे. दिल्लीने त्याला ५० लाख रुपयांत विकत घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
राजेश्वरीचे ‘राज’! महिला विश्वचषकात अशी कामगिरी करणारी बनली एकमेव गोलंदाज
‘शेन वॉर्नने मला मोठा मंच उपलब्ध करून दिला’, नाबाद १७५ धावा ठोकल्यानंतर ‘रॉकस्टार’ जडेजा भावुक
क्या बात! पुन्हा एकदा भारतापुढे पाकिस्तानला टेकावे लागले गुडघे, १०० टक्के विजयाचा रेकॉर्ड अबाधित