भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलूंमध्ये गणले जाते. त्याने आतापर्यंत बऱ्याचदा त्याच्या प्रदर्शनातून याचा प्रत्यय दिला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात रविवारी (०६ मार्च) मोहाली येथे २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (First Test) पार पडला. हा सामना भारतीय संघाने १ डाव आणि २२२ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. या सामना विजयात जडेजाचे मोठे योगदान राहिले. त्याला या सामन्यातील त्याच्या प्रदर्शनासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यातही आले. याबरोबरच जडेजाने या सामन्यात अष्टपैलू प्रदर्शन करत मोठे विक्रमही (Ravindra Jadeja Allrounder Record) आपल्या नावावर केले आहेत.
जडेजाचे श्रीलंकेविरुद्ध अष्टपैलू प्रदर्शन
या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी निवडली होती. या डावात जडेजाने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद १७५ धावा केल्या. २२८ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. जडेजाच्या या दीडशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेला ५७५ धावांचे भलेमोठे आव्हान दिले.
प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव सुरू असतानाही जडेजाने दमदार खेळ दाखवला. त्याने श्रीलंकेच्या पहिल्या डावात १३ षटके गोलंदाजी करताना केवळ ४१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावातही त्याचे शानदार गोलंदाजी प्रदर्शन सुरूच राहिले. या डावात त्याने श्रीलंकेच्या ४ फलंदाजांना पव्हेलियनला पाठवले. १६ षटके गोलंदाजी करताना ४६ धावा देत त्याने या विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे संपूर्ण सामन्यात जडेजाने ८७ धावांवर ९ विकेट्स घेण्याची विलक्षण कामगिरी केली.
हेही वाचा- फलंदाजीतच नाही, गोलंदाजीतही जडेजा ‘सुपरहिट’! बिशन सिंग बेदींच्या विक्रमाशी साधली बरोबरी
जडेजाने विक्रमांचे घातले रतीब
यासह जडेजा एका कसोटी सामन्यात १५० पेक्षा जास्त धावा करणारा आणि ९ विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय खेळाडू (First Indian Player) बनला आहे. आजवर त्याच्याव्यतिरिक्त कोणत्याच भारतीयाला ही कामगिरी जमलेली नाही.
तसेच कोणत्या कसोटी सामन्यात फलंदाजीत १५० पेक्षा जास्त धावा केल्यानंतर त्याच सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी करण्याचा शानदार विक्रमही जडेजाच्या खात्यात जमा झाला आहे. त्याच्याव्यतिरिक्त गॅरी सोबर्स आणि मुश्ताक मोहम्मद यांनीही हा कारनामा केला होता. गॅरी सोबर्स यांनी १९६६ मध्ये इंग्लंडविरुद्ध १५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. सोबतच ८० धावांवर ८ विकेट्सही घेतल्या होत्या. तर मोहम्मद मुश्ताक यांनी १९७७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १५० पेक्षा जास्त धावा केल्यानंतर ९७ धावांवर ८ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजीतच नाही, गोलंदाजीतही जडेजा ‘सुपरहिट’! बिशन सिंग बेदींच्या विक्रमाशी साधली बरोबरी
कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित सुपर-डुपर हिट, एका डावाने मॅच जिंकत केला मोठा रेकॉर्ड
एकावन्न वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या गावसकरांबद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?