पुणे दि. १८ ऑगस्ट २०२३- यंदाच्या ७७व्या स्वातंत्र्यदिनी पूना क्लब येथे तिरंगी झेंड्याचे ध्वजारोहण करण्यासाठी क्लबच्या व्यवस्थापन समितीने १५ ऑगस्ट २०२३ रोजी सेनादलाच्या दक्षिण विभागाचे कमांडिंग ऑफिसर ले. जन. ए. के. सिंग (एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम) यांना निमंत्रित केले होते. ले. जन. ए. के. सिंग यांनी या निमंत्रणाचा सन्मानपूर्वक स्वीकार केला.
सेनादलाच्या दक्षिण विभागाचे जवान आणि अधिकारी यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले होते. सकाळी १० वाजता ले. जन. ए. के. सिंग कार्यक्रमस्थळी दाखल झाले. क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना ध्वजारोहणस्थळी नेले व तेथे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर झालेल्या अनौपचारिक कार्यक्रमात सुनील हांडा यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. ले. जन. ए. के. सिंग हे केवळ एक अनुभवी आणि परिपूर्ण असे सेनाधिकारी आहेत असे नव्हे, तर भारतीय सेनादलाचे प्रतीकच असलेल्या निष्ठा, त्याग आणि देशभक्ती या गुणांचे ते जणूकाही प्रतिनिधित्वच करतात, असे सांगून सुनील हांडा म्हणाले, की आपण आज साजरा करीत असलेला स्वातंत्र्यदिन हा सेनादलातील जवान व अधिकारी यांची अहोरात्र देखरेख आणि असामान्य शौर्य यांचे फलित आहे.
आपले मनोगत व्यक्त करताना ले. जन. ए. के. सिंग म्हणाले, की प्रत्येक स्वातंत्र्यदिन हा भारताची विविधतेतून एकता व अखंडता या वैशिष्ट्याचे मूर्त प्रतीकचिन्ह आहे. इतकेच नव्हे तर सेनादलाच्या दक्षिण विभागातील प्रत्येक जवान, अधिकारी आणि कोपरा न् कोपरा हे भारताचे स्वातंत्र्य आणि देशाभिमान यांचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे आपण सर्वजण एकच आहोत, या भावनेचे प्रकटीकरण होते.
दक्षिण विभागाच्या कक्षेतील ७५ गडांवर याच वेळी सेनादलाच्या दक्षिण विभागातील जवानांनी ध्वजारोहण केले. त्याचे थेट प्रक्षेपण या कार्यक्रमादरम्यान खास उभारण्यात आलेल्या स्क्रीनवर दाखविण्यात आले. या जवानांनी या प्रसंगी देशाची सुरक्षितता आणि अखंडता कायम राखण्याची प्रतिज्ञा घेतली.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी पूना क्लबच्या १२०० सभासदांनी उपस्थिती नोंदविली होती. ले. जन. ए. के. सिंग यांनी या सर्व सदस्यांसह सेनादलाच्या दक्षिण विभागाचे सर्व जवान, अधिकारी, सेनादलाचे निवृत्त कर्मचारी, नागरी सुरक्षा अधिकारी व जवान, तसेच त्यांचे कुटुंबीय या सर्वांना ७७व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. (Independence Day flag hoisting at Poona Club in spirit)
महत्वाच्या बातम्या –
‘यांच्या’मुळे जबरदस्त कमबॅक करू शकलो! आयर्लंडला पहिल्या टी-20त मात दिल्यानंतर बुमराहची खास प्रतिक्रिया
लयच भारी रे! ‘कमबॅक मॅन’ बुमराहने पहिल्याच षटकात उडवल्या दांड्या, आयर्लंड अडचणीत