---Advertisement---

Independence Day Special| दुर्दैवच भारतीय स्वातंत्र्याच्या दिवशीच‌ यशस्वी कर्णधाराने घेतलेला जगाचा निरोप

On: मंगळवार, ऑगस्ट 15, 2023 12:13 AM
---Advertisement---

मंगळवारी (15 ऑगस्ट, 2023) भारताच 76वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. देशातील प्रत्येक नागरिक या आनंदाच्या प्रसंगी हर घर तिरंगा या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने भाग घेताना दिसतोय. भारतीय स्वातंत्र्याच्या या 76 निमित्त आपण क्रिकेटविश्वातील 15 ऑगस्ट या तारखेशी संयोग असलेल्या काही घटनांना उजाळा देत आहोत. ‌त्याच अनुषंगाने या आनंदाच्या दिवशी निधन झालेल्या क्रिकेटपटूंविषयी आपण जाणून घेऊया.

अजित वाडेकर-
भारतीय क्रिकेट इतिहासातील यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या अजित वाडेकर यांना दुर्दैवाने 15 ऑगस्ट याच दिवशी देवाज्ञा झाली होती.‌ त्यांच्याच नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्यांदा इंग्लंड व वेस्ट इंडीजमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. भारतासाठी 37 कसोटी सामने खेळलेल्या वाडेकर यांनी 2113 कसोटी धावा केल्या होत्या. निवृत्तीनंतर ते भारतीय संघाचे मॅनेजर आणि प्रशिक्षक देखील बनलेले. 2018 मध्ये वृद्धापकाळाने मुंबई येथे त्यांचे निधन झाले होते.

व्हीबी चंद्रशेखर-
अजित वाडेकर यांच्या प्रमाणेच 15 ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्याच्या दिवशी निधन झालेले दुसरे भारतीय क्रिकेटपटू म्हणजे वक्कडाई बिश्वेशरन चंद्रशेखर हे होत. चंद्रशेखर यांनी भारतीय संघासाठी केवळ सात वनडे सामने खेळले होते. मात्र, तमिळनाडू संघासाठी क्रिकेट खेळणाऱ्या चंद्रशेखर यांना देशांतर्गत क्रिकेटमधील मोठे खेळाडू मानले जायचे. चंद्रशेखर यांनी निवृत्तीनंतर समालोचन व क्रिकेट प्रशासन या क्षेत्रातही भरीव कामगिरी केलेली. 2019 मध्ये तमिळनाडू प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी त्यांनी चेन्नई येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

या दोन भारतीय क्रिकेटपटूंव्यतिरिक्त न्यूझीलंडचे एरिक डेम्पस्टर यांना 2011 तर श्रीलंकेच्या सेल्ली पोन्नादुराई या क्रिकेटपटूंना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच देवाज्ञा झाली होती.

महत्वाच्या बातम्या-
स्वदेश असो वा परदेश, देशप्रेम महत्त्वाचं! जेव्हा टीम इंडियाने सातासमुद्रापार फडकावलेला तिरंगा
Independence Day Special | भारताच्या स्वातंत्र्यदिनी जन्मलेले नशीबवान इंडियन क्रिकेटर्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---