---Advertisement---

स्वदेश असो वा परदेश, देशप्रेम महत्त्वाचं! जेव्हा टीम इंडियाने सातासमुद्रापार फडकावलेला तिरंगा

On: मंगळवार, ऑगस्ट 15, 2023 12:11 AM
India-Flag-In-England-Video
---Advertisement---

संपूर्ण भारतात स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी प्रत्येक घरात झेंडा फडकावत ‘हर घर तिरंगा’ अभियान साजरा होतोय. पण तुम्हाला माहितीय का, असेच एकदा सातासमुद्रापार इंग्लंडमध्ये स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकावला गेला होता. त्याचाच हा किस्सा.

वर्ष 2021 मध्ये भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात उभय संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 12 ते 16 ऑगस्टदरम्यान खेळला गेला होता. अशातच या सामन्याचा चौथा दिवस (15 ऑगस्ट) सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांनी लॉर्ड्समधील त्यांच्या हॉटेल बाहेर ध्वजारोहण केले होते.

https://twitter.com/BCCI/status/1426845948634824706?s=20&t=Ui2f4v5xmhsmYMT-7QbykQ

15 ऑगस्टला दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी लॉर्ड्समध्ये ध्वजारोहण करण्यात आले होते. भारतीय संघातील सदस्यांनी लॉर्ड्समधील त्यांच्या हॉटेल बाहेर ध्वजारोहण केले होते. त्यावेळी ध्वजारोहण करण्याचा मान माजी कर्णधार विराट कोहलीला देण्यात आला होता. ध्वजारोहण झाल्यानंतर सर्वांनी एक सुरात राष्ट्रगीत गायले होते. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू, त्यांचे कुटुंबिय आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य या अभिमानास्पद क्षणाचा भाग बनले होते. भारतीय संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला होता.

सातासमुद्रापार इंग्लंडमध्ये तिरंगा फडकावला गेल्याचा क्षण डोळ्यांत पाणी आणणारा क्षण होता. विशेष म्हणजे, क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्समध्ये हा ध्वज फडकावण्यात आला होता, जो भारतीय क्रिकेटपटूंसाठी आणखीनच अभिमानास्पद क्षण होता.

दरम्यान या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेबाबत बोलायचे झाल्यास, ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तो फॉर्मात परतला तर…’ पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने आपल्याच संघाला दिलाय इशारा

एका सुवर्ण युगाचा अंत! ‘बिग बुल’च्या निधनाने हळहळले भारतीय दिग्गज

झिम्बाब्वे दौरा जिंकण्यासाठी राहुलकडे आहेत ‘हे’ ३ हुकमी एक्के! कोणत्याही क्षणी निकाल बदलण्यात पटाईत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---