तिरुअनंतपूरम। आज(6 सप्टेंबर) भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ संघात 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना पार पडला. पावसाच्या व्यत्ययामुळे 20-20 षटकांचा करण्यात आलेल्या या सामन्यात भारताने 36 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबर भारतीय संघाने ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली.
भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला या सामन्याचा सामनावीर पुरस्कार मिळाला. त्याने या सामन्यात 48 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांसह 91 धावांची खेळी केली. तसेच त्याच्याबरोबरच शिखर धवनने 36 चेंडूत 51 धावांची खेळी केली. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरनेही 19 चेंडूत 36 धावांची छोटेखानी खेळी केली.
त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 204 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य दिले. दक्षिण आफ्रिकेकडून ब्युरन हेंड्रिक्स आणि जॉर्ज लिंडने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
यानंतर 205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात सर्वबाद 168 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून रिझा हेंड्रिक्सने 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच काइल व्हररिनने 44 धावांची खेळी करत चांगली लढत दिली. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही.
भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट्स तर इशान पोरेल, तुषार देशपांडे, राहुल चहर आणि शिवम दुबेने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
या 5 वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिले तीन सामने भारताने जिंकले होते. पण भारताला चौथ्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर पाचव्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेचा शेवट गोड केला.
CHAMPIONS! 🏆
India A clinch the 5-match @Paytm one-day series against South Africa A 4-1. Sanju Samson named Man of the Match for his 48-ball 91. #INDAvSAA pic.twitter.com/MM2KYtbQZ9
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 6, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–…म्हणून विंडीज विरुद्ध अश्विन ऐवजी जडेजाला मिळाली संधी, कोहलीने केला खूलासा
–भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवने घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन, पहा व्हिडिओ
–ऍशेसमध्ये अशी कामगिरी करणारा स्टिव्ह स्मिथ पहिलाच फलंदाज!