---Advertisement---

भारत-ऑस्ट्रेलिया सराव सामना : शुभमन गिल-पृथ्वी शॉ शुन्यावर बाद, तर रहाणे आणि पुजारा….

On: रविवार, डिसेंबर 6, 2020 9:32 AM
---Advertisement---

टी20 मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. 17 ते 21 डिसेंबर या कालावधीत पहिला कसोटी सामना खेळला जाईल.

कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ या दोन संघात 3 दिवसीय सराव सामन्याला आज (6 डिसेंबर) सुरुवात झाली. या सामन्यात भारत अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ याला भोपळाही फोडला आता नाही. त्याचबरोबर त्याचा सहकारी सलामीवीर शुभमन गिलही खाते उघडण्यात अपयशी ठरला. 2.2 षटकानंतर भारताची धावसंख्या 2 बाद 6 धावा अशी झाली होती.

तिसऱ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याने खेळपट्टीवर वेळ घेतला आणि हळू- हळू डाव पुढे नेला. दुसऱ्या टोकाला असलेला फलंदाज हनुमा विहारी यानेही त्याच्या खेळीची संयमी सुरुवात केली, मात्र त्यालाही अधिक काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्याला वेगवान गोलंदाज जॅकसन बर्डने 15 धावांवर पायचीत केले.

विहारी बाद झाल्यावर भारताची धावसंख्या 3 बाद 40 अशी होती. त्यानंतर भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहणे फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याने त्याच्या कसोटी शैलीत पुजारासह डाव पुढे नेला.

पहिले सत्र संपन्न झाल्यावर भारत अ संघाची धावसंख्या 3 बाद 65 अशी होती. पुजारा 27 तर राहणे 16 धावांवर खेळत होते.

दुसऱ्या उत्तरार्धातही या दोघांनी जबाबदारीने डाव पुढे नेला आणि 50 धावांची भागीदारी पूर्ण केली. 43 षटकानंतर भारताची धावसंख्या 3 बाद 97 होती.

महत्त्वाच्या बातम्या –

ब्रेकिंग ! ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कची भारताविरुद्ध टी20 मालिकेतून माघार; ‘हे’ आहे कारण

‘जडेजाला ११ वर्षांनंतरही तितका सन्मान मिळत नाही’, माजी भारतीय खेळाडूने व्यक्त केली खंत

‘हा’ ऑस्ट्रेलियन गोलंदाज बनला बुमराहचा ‘फॅन’, म्हणाला…

ट्रेंडिंग लेख –

‘बर्थडे बॉय’ रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?

भारताच्या ‘या’ ५ दिग्गज क्रिकेटपटूंचा आज आहे वाढदिवस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---