न्यूझीलंड ए संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला गुरूवारी (22 सप्टेंबर) सुरूवात झाली. या मालिकेत भारताचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहे. एमए चिंदरबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या या पहिल्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. यावेळी भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांनी न्यूझीलंडला 200च्या आतच रोखले आहे.
या सामन्यात भारताच कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंंकली. त्यांनी विरोधी संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यावेळी शार्दुल ठाकुर आणि कुलदीप सेन यांनी विरोधी संघाच्या फलंदाजांना सळो की पळो केले आहे. शार्दुलने सलामीवीर चॅड बोउज (10) याला त्रिफळाचीत करत विरोधी संघाला पहिला धक्का दिला. अशातच सेननेही सलामीला आलेल्या रचिन रविंद्र याला सॅमसनकरवी झेलबाद करत भारताच्या पारड्यात दुसरी विकेट टाकली.
एकीकडे न्यूझीलंडच्या विकेट पडत असताना मायकल रिपॉन आणि जोइ वॉल्कर यांनी सामना सांभाळण्याचा प्रयत्न केला. भारतासाठी ही जोडी धोकादायक ठरत असताना रजत पाटीदार याने वॉल्करला (36) धावबाद केले. तर मायकलला (61) शार्दुलने रिषी धनवकरवी झेलबाद केले.
यावेळी शार्दुलने 8.2 षटके टाकली असून त्यातील एक षटक निर्धाव टाकले. यामध्ये त्याने 3.84 च्या इकॉनॉमी रेटने 32 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याने बोउज आणि मायकलबरोबर विकेटकीपर डेन क्लेव्हर (4) आणि कर्णधार रॉबर्ट ओ डोनेल (22) यांना बाद केले. त्याला कुलदीप सेन यानेही चांगली साथ दिली आहे. त्याने 7 षटके टाकताना 30 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यानेही गोलंदाजी केली आहे. यावेळी त्याला एकही विकेट मिळाली नाही, मात्र त्याने उत्तम गोलंदाजी केली आहे. त्याने 7 षटकात 27 धावा दिल्या असून एक निर्धाव षटकही टाकले आहे. तसेच कुलदीप यादव यानेही 9 षटकात 22 धावा देत 1 विकेट घेतली. तर न्यूझीलंडने 40.2 षटकात सर्वबाद 167 धावसंख्या उभारली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बापरे! तब्बल २२ क्रिकेटपटूंच्या ऑटोग्राफला मिळाला होता केवळ एक रुपया
“अन् ‘त्या’ सल्ल्यामुळे धोनीला दिले कर्णधारपद”, शरद पवारांचा जुन्या आठवणींना उजाळा
कॅप्टन हरमनप्रीतने केली इंग्लंडची धुलाई! सलग 11 चेंडूत चौकार-षटकारांचा पाऊस पाडत कुटल्या ‘इतक्या’ धावा