बेंगळुरू येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या अनधिकृत कसोटीच्या तिसऱ्या दिवशी, भारत अ ने त्यांचा दुसरा डाव 359/7 वर घोषित केला. त्यानंतर, आता अखेरच्या डावात न्यूझीलंड अ संघासमोर विजयासाठी 416 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. रजत पाटीदारचे नाबाद शतक भारतीय डावाचे वैशिष्ट्य ठरले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा, न्यूझीलंडने 14 षटकांत 1 बाद 20 धावा केल्या होत्या. पाहुण्या संघाला विजयासाठी अखेरच्या दिवशी आणखी 396 धावांची गरज आहे.
तिसऱ्या दिवशी सकाळी नाबाद फलंदाज प्रियांक पांचाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी 1बाद 40 पासून सुरुवात केली. दोघांनी शानदार फलंदाजी करत आपआपली अर्धशतके पूर्ण केली. उपाहारापर्यंत भारताने 2 बाद 130 धावा केल्या होत्या. पांचाल 62 धावांवर बाद झाला. तर गायकवाड वैयक्तिक 62 धावांवर नाबाद होता. उपाहारानंतर ऋतुराज 94 धावांवर बाद झाला.
त्यानंतर रजत पाटीदार आणि सर्फराज खान यांनी जबरदस्त फलंदाजी केली आणि चहापानापर्यंत भारताची धावसंख्या 241 पर्यंत नेली. चहापानापूर्वी पाटीदारने आपले अर्धशतक पूर्ण केले. चहापानानंतर पाटीदारने शतक पूर्ण केले. दुसरीकडे, सर्फराज अर्धशतक पूर्ण केल्यानंतर 63 धावा करून बाद झाला. भारताने 7 बाद 359 वर डाव घोषित केला. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने तीन आणि जो वॉकरने दोन बळी मिळवले.
दुसऱ्या डावात न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रचिन रवींद्र 12 धावा करून सौरभ कुमारच्या चेंडूवर पायचित झाला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांना यश मिळाले नाही. दिवसाचा खेळ संपला तेव्हा, जो कार्टर 6 आणि जो वॉकर खाते न उघडता मैदानावर उपस्थित आहेत. रविवारी सामन्याचा अखेरचा दिवस असल्याने भारतीय संघ जिंकण्याच्या अपेक्षेने मैदानात उतरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपआधीच रोहित आणि द्रविडला मिळाली वॉर्निंग! काय आहे संपूर्ण प्रकरण?
विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा! टी20 इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
गुजरात टायटन्सने शुबमन गिलला दिला नारळ? ट्विट करत लिहिले…






