इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवून भारतीय संघाने पुन्हा एकदा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानला मागे टाकून स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटींची मालिका खेळली जात आहे. मालिकेचा चौथा सामना लंडनच्या ओव्हलमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा १५७ धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. ओव्हलमध्ये ५० वर्षांनंतर भारतीय संघाचा हा पहिला विजय आहे.
या विजयासह, भारतीय संघ २०२१-२३ च्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघाने आता पाकिस्तानला मागे सोडले आहे.
या विजयानंतर, भारतीय संघाचे आता विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२३ च्या गुण तालिकेत २६ गुण आणि ५८.३३% टक्के (PCT) अंक आहेत. त्यापाठोपाठ पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचा संघ आहे, ज्यांनी संयुक्तपणे दुसरे स्थान मिळवले आहे. दोन्ही संघांचे १२-१२ गुण आणि ५०% अंक आहेत.
गुणतालिकेत सध्या फक्त ४ संघ आहेत. कारण या चौघांनी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत मालिका खेळण्यास सुरुवात केली आहे. उर्वरित संघ आपापल्या मालिका लवकरच सुरू करतील. भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजनंतर इंग्लंड हा गुणतालिकेत चौथा संघ आहे. इंग्लंडने आतापर्यंत फक्त एक सामना जिंकला आहे आणि एक अनिर्णीत राहिला आहे. अशा स्थितीत इंग्लंड संघाचे १४ गुण आणि २९.१७ अंक झाले आहेत.
प्रत्येक कसोटी सामना विजेत्यासाठी १२ गुण, बरोबरीसाठी ६ गुण आणि अनिर्णीतसाठी ४ गुण दिले जातात. जिंकलेल्या प्रत्येक सामन्यासाठी टक्केवारीनुसार १०० अंक, बरोबरीसाठी ५० अंक आणि अनिर्णीतसाठी ३३.३३ अंक दिले जातात.
म्हणजेच ५ कसोटींच्या मालिकेत एकूण ६० गुण असतील. ४ सामन्यांच्या मालिकेत ४८, ३ सामन्यांच्या मालिकेत ३६ आणि दोन कसोटींच्या मालिकेत २४ गुण. भारत आणि इंग्लंड यांच्यातील या मालिकेदरम्यान, दोन्ही संघांना षटकांची गती कमी राखल्यामुळे २-२ गुणांचे नुकसान झाले आहे. पहिल्या तीन कसोटींतून त्यांना १६ गुण मिळणार होते, पण आता केवळ १४ गुण मिळाले आहेत. सामना गमावल्यामुळे इंग्लंडचे समान गुण आहेत पण सामना जिंकल्यामुळे भारताचे गुण वाढतील.
महत्त्वाच्या बातम्या-
“जर कोणी शार्दुल ठाकूरचा फॅन क्लब काढला, तर मला त्याचा पहिला सदस्य बनयला आवडेल”
भारतीय गोलंदाजांनी केली कमाल! तब्बल ४ फलंदाजांना क्लीन बोल्ड करत पहिल्यांदाच केला ‘असा’ पराक्रम