---Advertisement---

‘सिडनीच्या मैदानावर शेरेबाजी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही’

---Advertisement---

सिडनी कसोटी सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी अतिशय लाजिरवाणी घटना मैदानावर पाहण्यास मिळाली. भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी वर्णद्वेषी शेरेबाजी केली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस अशी एक घटना निदर्शनास आली होती, तसेच चौथ्या दिवशीही याच घटनेची पुनरावृत्ती झाली. या घटनेनंतर काही काळ खेळ देखील थांबवण्यात आला होता.

या घटनेचे तीव्र पडसाद क्रिकेट जगतात उमटले. अनेक आजी-माजी खेळाडूंनी या घटनेवर संताप व्यक्त केला, तर काहींनी अशा प्रेक्षकांवर बंदी घालण्याचीही मागणी केली. आजचा खेळ संपल्यानंतर आभासी पत्रकार परिषदेत बोलताना भारताचा फिरकीपटू आर अश्विनने देखील या घटनेवर कठोर पावले उचलली जावी, अशी मागणी केली.

“अशा प्रकारच्या घटना सिडनीत नित्याच्याच”

सिडनीत यापूर्वीही भारतीय खेळाडूंनी अशा शेरेबाजीचा सामना केले असल्याचे सांगत अश्विन म्हणाला, “माझा हा ऑस्ट्रेलियाचा चौथा दौरा आहे. सिडनीत या प्रकारचे अनुभव आम्ही यापूर्वीही घेतले आहेत. त्यातील काही वेळा खेळाडूंनी त्याला प्रत्युतर देण्याचाही प्रयत्न केला आहे. आणि माझ्या मते त्यात खेळाडूंची नव्हे तर प्रेक्षकांची चूक होती. ज्या पद्धतीने प्रेक्षक, विशेषतः सीमारेषेच्या जवळ असलेल्या स्टँडमधील प्रेक्षक शेरेबाजी करतात, त्याचा हा परिणाम असतो.”

आजच्या घटनेबद्दल बोलताना तो म्हणाला, “आक्षेपार्ह भाषेत याआधीही टिप्पण्या झाल्या असल्या तरी यावेळी एक पाऊल पुढे जाऊन यावेळी त्यांनी वर्णद्वेषी शेरेबाजी केली आहे. आम्ही कालच याविरोधात तक्रार नोंदवली होती आणि पुन्हा असा काही प्रकार झाल्यास पंचानी आम्हाला ते तात्काळ निदर्शनास आणून देण्याचे सांगितले होते, ज्यामुळे त्यांना कारवाई करणे शक्य होईल. सध्याच्या काळात आपण ज्या परिस्थितून जात आहोत त्यात हे अजिबात स्वीकारार्ह नाही. त्यामुळे याविरुद्ध कठोर पावले उचलण्यात यावी, अशी आमची इच्छा आहे.”

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर भारतीय संघाने तात्काळ पंचाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पोलिसांनी ही शेरेबाजी करणाऱ्या सहा प्रेक्षकांना त्याचवेळी मैदानाबाहेर काढले होते. बीसीसीआयने याविरोधात आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

स्मिथ आणि लॅब्यूशेनच्या विरोधातील द्वंदाबाबत अश्विनचे भाष्य; म्हणाला

सिडनी कसोटीत बुमराह-सिराजवर वर्णद्वेषी टीका झाल्यानंतर अशा उमटल्या आजी-माजी खेळाडूंच्या प्रतिक्रिया

अरे पकडा पकडा! चेंडू हातून निसटल्यावर पठ्ठ्याने थेट पायांनी घेतला झेल, व्हिडिओ भन्नाट व्हायरल 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---