भारत आणि ऑस्ट्रेलिया हे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम संघांपैकी दोन संघ आहेत. तसेच वर्षानुवर्ष नियमित रूपाने या खेळामध्ये ते एकमेकांना टक्कर देत आहेत. अशाप्रकारे अकरा ते बारा जणांचा संघ तयार करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील काही खेळाडूंना निवडणे नक्कीच कठीण काम आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तरीही भारतीय संघाचा माजी फलंदाज आकाश चोप्राने नुकतीच ही जबाबदारी पार पाडली. त्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा संयुक्तपणे कसोटी संघ निवडला आहे. यामध्ये त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला डच्चू दिला आहे.
सेहवाग आणि हेडन सलामी फलंदाज निवडले
चोप्राने आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो संघ निवडताना दिसत आहेत. चोप्राने सध्याच्या खेळाडूंसोबतच त्या खेळाडूंचीही निवड केली, ज्यांच्यासोबत आणि ज्यांच्याविरुद्ध तो खेळत होता. त्यावर चोप्रा हे ही म्हणाला की, त्याने दोन्ही देशांमध्ये आपल्या कामगिरीच्या आधारावर खेळाडूंना निवडले आहे.
आकाश चोप्राने वीरेंद्र सेहवाग आणि मॅथ्यू हेडन यांना सलामी फलंदाज म्हणून निवडले. चोप्राने सेहवागला देशातील कारनामे आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कामगिरीवर निवडले. त्याने हेडनची स्तुती करण्यापूर्वी डेविड वॉर्नरला न निवडण्याचे कारणही सांगितले.
पाँटिंग आणि द्रविडच्या आधी पुजाराला संधी
आकाश चोप्रा म्हणाला, “मी डेविड वॉर्नरसारख्या खेळाडूला निवडले नाही. त्याने दूरच्या परिस्थितीत चांगले प्रदर्शन केले नाही. त्याच्याऐवजी मी मॅथ्यू हेडनला निवडले आहे. तो एक घाबरवणारा फलंदाज होता. तो फलंदाजी करताना स्लेजिंग करत होता.”
क्रमांक 3 साठी, त्याने राहुल द्रविड आणि रिकी पाँटिंग यांच्या आधी चेतेश्वर पुजाराला स्थान दिले आहे. त्याने सांगितले की, द्रविडने आपले दोन सामने जिंकवणाऱ्या शतकाशिवाय खूप काही केले नाही. पाँटिंगची भारताविरुद्ध खराब कामगिरी आहे. पुजारा सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज आहे, तेव्हा भारताने ऑस्ट्रेलियात आपली पहिली कसोटी मालिका जिंकली होती. त्याने चौथ्या क्रमांकासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकरची निवड केली.
कोहलीला दिली नाही जागा
“चौथ्या क्रमांकासाठी सचिनची निवड करणे, याबद्दल काहीही शंका नाही. त्याची सरासरी 55 ची आहे आणि त्याने 11 शतके ठोकली आहेत. पाचव्या क्रमांकासाठी त्याने व्हीव्हीएस लक्ष्मणची निवड केली आहे. त्याची सरासरी 49 ची आहे आणि त्याने 6 शतके ठोकली आहेत,” असे चोप्रा म्हणाला.
पुढे बोलताना तो म्हणाला, विराट कोहलीचेही नाव येऊ शकते. परंतु सामील नाही करू शकत. कारण मागील दोन तीन मालिकेत त्याने धावा केल्या नाहीत.
चोप्राच्या संघात संघात शेवटचा विशेष फलंदाज स्टीव्ह स्मिथ होता. त्याचबरोबर त्याने एमएस धोनीऐवजी ऍडम गिलख्रिस्टला यष्टीरक्षक म्हणून स्थान दिले.
गोलंदाजी विभाग
आपल्या गोलंदाजी विभागात आकाश चोप्राने दोन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाज निवडले आहेत. भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेला शेन वॉर्न, हरभजन सिंग आणि आर अश्विन यांच्याआधी त्याने निवडले आहे. त्याने भारताविरुद्ध शेन वॉर्नरला साधारण आकडेवारीमुळे त्याची निवड न करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर दुसरा फिरकीपटू म्हणून आकाश चोप्राने नॅथन लायनला निवडले. त्याने वेगवान गोलंदाज म्हणून ग्लेन मॅकेग्रा, झहीर खान आणि ब्रेट लीची निवड केली.
आकाश चोप्राचा भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संयुक्त कसोटी संघ-
वीरेंद्र सेहवाग, मॅथ्यू हेडन, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, स्टीव्ह स्मिथ, ऍडम गिलख्रिस्ट, अनिल कुंबळे, नॅथन लायन, झहीर खान, ग्लेन मॅकेग्रा, ब्रेट ली
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ सामन्यात माजी कर्णधार सौरव गांगुली पुन्हा एकदा दिसणार मैदानात चौकार- षटकार ठोकताना
बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी सचिनचा भारतीय फलंदाजांना कानमंत्र, म्हणाला…