---Advertisement---

‘या क्षणाला भारत आणि आयपीएल दोन वेगवेगळे जग आहेत’

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मग ते कोरोना काळात भारतासाठी केलेली मदत असो वा आपली मैदानातील कामगिरी. आता पुन्हा एकदा कमिन्स चर्चेत आला असून ते देखील आपल्या एका भावनिक प्रतिक्रियेमुळे.

घडले असे की आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित होण्याच्या एक दिवसापूर्वीच कमिन्सने आयपीएलमधील जीवन व भारतातील सध्याची कोरोना परिस्थिती या बद्दल आपले मत मांडले होते.

कमिन्स भारतातील सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना म्हणाला की, आम्ही भाग्यशाली आहोत कारण आम्ही भारतात असून देखील सुरक्षित आहोत. कारण भारतात लोक प्राथमिक उपचार व इतर गरजांसाठी देखील संघर्ष करत आहेत. यादरम्यानच त्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने आयपीएल 2020 व आयपीएल 2021 ची तुलना देखील केली आहे.

कमिन्सने प्रतिक्रिया दिली की, आयपीएल 2021 मध्ये निश्चितच आयोजक काही बाबींवर आणखी लक्ष देऊ शकत होते. कमिन्सच्या मते आयपीएल 2020 चे आयोजन अतिशय चोख करण्यात आले होते. कमिन्स म्हणाला की, “यावर्षी त्यांनी (बीसीसीआय) भारतात आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. मी नक्की सांगू शकतो की काही बाबी निश्चितच आणखी चांगल्या करता आल्या असत्या.”

कमिन्सची ही प्रतिक्रिया आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बायोबबलमध्येही कोरोनाचा प्रसार झाल्याकारणाने आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करण्यात आली. स्पर्धेदरम्यान वरूण चक्रवर्ती, संदीप वॉरियर, अमित मिश्रा तसेच इतरही अनेक खेळाडू व कोचिंग स्टाफ मधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

‘कोरोना हा आता विनोदाचा भाग राहिलेला नाही’, चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूची प्रतिक्रिया

‘यावेळी संघ फॉर्ममध्ये होता’, फाफ डू प्लेसिसने भावनिक संदेशासह घेतला आयपीएलचा निरोप

आयपीएल स्थगित झाल्यानंतरही ‘या’ कारणामुळे इंग्लंडला जाण्यापूर्वी न्यूझीलंडचे खेळाडू १० मे पर्यंत भारतातच थांबणार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---