दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत अवघ्या काही मिनिटांमध्ये भारताठी परिस्थिती पूर्णपणे बदलली. अवघ्या 14 मिनिटांमध्ये भारतीय संघाने 6 विकेट्स गमावल्या आणि संघ सर्वबाद झाला. भारताला या सामन्याच्या पहिल्या डावात 153 धावांवर समाधान मानावे लागले. शेवटच्या पाचही खेळाडूंनी शुन्यावर विकेट्स गमावल्या. पिहला डाव संपल्यानंतर भारताला 98 धावांची आघाडी मिळाली.
दक्षिण आप्रिका संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. यजमान संघ पहिल्या डावात 23.2 षटकात अवघ्या 55 धावा करून सर्वबाद झाला. मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 6, तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स नावावर केल्या. प्रत्युत्तर रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी भारताला आघाडी मिळवून दिली. पण त्यानंतरचा एकही फलंदाज संघासाठी मोठी खेळी करू शकला नाही. विशेष म्हणजे संघातील शेवटचे 6 फलंदाज एकही धाव करू शकले नाही.
श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी सुन्यावर विकेट्स गमावल्या. मुकेश कुमार देखील शुन्य धावांवर नाबाद राहिली. यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याने 8 धावांवर विकेट गमावली. तत्पूर्वी सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल यानेही शुन्यावर विकेट गमावली होती. कर्णधार रोहितने 39, शुबमन गिलने 36, तर विराटने 46 धावांची खेळी या डावात केली.
दक्षिण आप्रिकेसाठी शेवटचे षटक कागिसो रबाडा याने टाकले, तर त्याआदीच्या षटकात लुंगी एनगिडी याने गोलंदाजी केली. या दोघांनी शेवटच्या दोन षटकात एखही धाव न खर्च करता प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. परिणामी भारतीय संघ अवघ्या 153 धावांवर गुंडाळला गेला.
भारताची धावसंख्या एके वेळी 4 विकेट्सच्या नुकसानावर 153 होती. त्यानंतर पुढच्या सहा विकेट्स जाईपर्यंत संघाला एकही धाव मिळाली नाही. 153 धावांवर भारताने आपली 10वी विकेट गमावली. रबाडा आणि एनगिडीसह दक्षिण आफ्रिकेसाठी नांद्रे बर्गर यानेही तीन विकेट्स नावावर केल्या. मार्को जेन्सन याला या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही.
केपटाऊन कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर (कर्णधार), एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
संपुर्ण वेळापत्रक: प्रत्यक्ष मैदानात जाऊन मॅचेस पाहण्याची संधी, 2024मध्ये ‘इंडिया’ खेळणार तुफान सामने
SA vs IND । यान्सेनच्या विकेटचं श्रेय सिराजइतकंच विराटला! माजी कर्णधाराचा अनुभव आला कामी, पाहा व्हिडिओ