सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याचा आज(6 जानोवारी) चौथा दिवस आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावातील 322 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये याआधी 1986 मध्ये फॉलोऑन दिला होता. विशेष म्हणजे त्यावेळीही भारताने सिडनी कसोटीतच आणि 6 जानेवारीलाच ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला होता. तो सामना अनिर्णित राहिला होता.
सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला होता. त्याच्या प्रतिउत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सर्वबाद 300 धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला आहे.
या डावात भारताकडून कुलदीप यादवने 5 विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला. तर रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 विकेट् आणि जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाला याआधी त्याच्या मायदेशात शेवटचा फॉलोऑन फेब्रुवारी 1988 मध्ये इंग्लंडने दिला होता. हा सामनाही सिडनी येथे खेळवण्यात आला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ आत्तापर्यंत मायदेशात 172 कसोटी सामने खेळला आहे.
त्यामुळे 30 वर्षांनंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला मायदेशात फॉलोऑनला सामोरे जावे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग २० – चिरतरुण जाफर
–टीम इंडियाने ६२२ धावांचा डोंगर उभारण्यात पाकिस्तानच्या या तीन गोलंदाजांचेही मोठे योगदान
–ऑस्टेलिया दौऱ्यातील भारतीय संघाच्या विजयामागे राहुल द्रविड