fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टीम इंडियाने ६२२ धावांचा डोंगर उभारण्यात पाकिस्तानच्या या तीन गोलंदाजांचेही मोठे योगदान

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला आहे. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात तिसऱ्या दिवसाखेर 6 बाद 236 धावा केल्या आहेत.

भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावात 600 पेक्षा अधिक धावा करण्यात पाकिस्तानच्या सलमान इर्शाद, हॅरिस राऊफ आणि अब्बास बलोच या तीन गोलंदाजांचेही महत्त्वाचे योगदान आहे. या तीघांनीही भारतीय संघातील फलंदाजांना सिडनी कसोटीआधी नेटमध्ये सराव दिला होता.

यामध्ये भारतीय-ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक संजीव दुबे यांची मदत झाली आहे. दुबे हे भारतीय फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांचे मित्र आहेत. याबद्दल दुबे म्हणाले त्यांनी थेट काहीही केले नाही फक्त संघाला बाहेरुन पाठिंबा दिला आहे.

या नेट सरावात हॅरिस आणि सलमानने भारतीय फलंदाजांना 145 च्या गतीने गोलंदाजी केली आहे. तसेच हे दोघेही पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळले आहेत. ते लाहोर कलंदर्स संघाकडून खेळले आहेत.

तसेच मागील काही महिन्यांपासून हे दोघेही ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहेत. तसेच अब्बास याचा जन्मही पाकिस्तानात झाला आहे. पण तो सध्या ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळतो.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्टेलिया दौऱ्यातील भारतीय संघाच्या विजयामागे राहुल द्रविड

Video: रहाणेने घेतला अफलातून झेल; फलंदाजही झाला आश्चर्यचकित

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ विकेट्स घेणाऱ्या कुलदीपसाठी ऑस्ट्रेलियाच्याच दिग्गजाचा सल्ला ठरला मोलाचा

You might also like