भारताच्या स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवासाठी अनेक जण विविध कल्पना लढवत आहेत. अशाच खेळ क्षेत्र कुठे मागे राहिल. या ७५ वर्षात पुरूष क्रिकेट विश्वात घडलेल्या काही ऐतिहासिक क्षणांचा दृष्टीक्षेप आपण घेऊया.
१ भारताने १९३२मध्ये कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली, मात्र पहिला विजय १९५२मध्ये मिळाला. याचा अर्थ भारत स्वातंत्र झाल्यानंतर पहिला विजय मिळाला होता. २० वर्ष, २४ सामने यानंतरच भारताने चेन्नईच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा एक डाव आणि ८ धावांनी पराभव करत कसोटीच्या पहिल्या विजयाची चव चाखली होती.
२ भारताने १९७१मध्ये इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका जिंकली होती. अजित वाडेकर (Ajit Wadekar) यांच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० असा विजय मिळवला होता. भारताचा इंग्लंडमधील हा विजय आजही विशेष आहे.
३ कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३च्या विश्वचषक इंग्लंडमध्येच जिंकला होता. त्या स्पर्धेत भारताच्या नवख्या खेळाडूंनी अंतिम सामन्यात त्या काळच्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचा ४३ धावांनी पराभव केला होता. त्या सामन्यात कपिल यांनी विव रिचर्ड्स यांचा सामना बदलणारा झेल पकडला होता.
४ १९८५च्या वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. तर विश्वचषक जिंकल्याच्या दोन वर्षानंतरच या मोठ्या स्पर्धचे विजेतेपद पटकावले होते. त्या मालिकेत रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी उल्लेखनीय खेळी केली होती. यामुळे ते मालिकावीराचे मानकरी ठरले. त्यांनी ५ सामन्यांत ८ विकेट्स आणि १८२ धावा केल्या होत्या.
५ १९९८मध्ये शारजाह कप स्पर्धेत भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध १४३ धावा केल्या होत्या. त्या खेळीला ‘डेझर्ट स्टोर्म’ म्हटले जाते. कारण ती खेळीच इतकी जबरदस्त होती की आजही क्रिकेट चाहत्यांना अंगावर शहारे उभे राहतात. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेली ती खेळी वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळी ठरली आहे.
६ २००२मध्ये भारताचा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवरील तो वनडे सामना विजय. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नॅटवेस्ट ट्रॉफीमध्ये खेळत होता. अंतिम सामन्यात भारताला विजयासाठी शेवटच्या ४ चेंडूत २ धावांची आवश्यकता होती, तेव्हा दोनच विकेट शिल्लक होत्या. अँड्र्यू फ्लिंटाॅफच्या गोलंदाजीवर झहीर खानने २ धावा घेतल्याने भारताने तो सामना जिंकला होता. या सामन्यानंतर गांगुलीने जर्सी काढून जल्लोष केला होता. आजही तो सामना आणि गांगुलीचे सेलेब्रेशन भारतीय चाहते विसरलेले नाही.
७ २००३ वर्ष भारतासाठी विशेष ठरले असते, मात्र वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत झाला. सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने अंतिम सामना १२५ धावांनी गमावला होता.
८ २००७च्या वनडे विश्वचषकात भारत साखळी फेरीत बांगलादेशकडून पराभूत झाल्याने स्पर्धेबाहेर पडला होता. राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने या स्पर्धेत अंत्यत खराब कामगिरी केली होती.
९ २००७च्या वर्ष भारतासाठी मिश्र वर्ष ठरले. त्यावेळी भारताने वनडे विश्वचषक गमावला होता तर टी२० विश्वचषक जिंकला होता. भारताने पहिल्या टी२० विश्वचषकात एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात एस श्रीसंथने पाकिस्तानच्या मिसबाह उल हकचा झेल पकडला ते पाहून संपूर्ण देश हादरले होते. भारताने पाकिस्तानला पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला होता.
१० पहिल्या टी२० विश्वचषकाच्या विजयानंतर बरोबर ४ वर्षांनी भारतीय संघाने दुसरा वनडे विश्वचषक जिंकला. त्यावेळेचा कर्णधार धोनीने अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध उत्तुंग षटकार मारत भारताला २८ वर्षानंतर विश्वचषक जिंकून दिला. सचिन तेंडुलकरचा हा शेवटचा विश्वचषक होता.
११ २०१३ची चॅम्पियन ट्रॉफी विजय, २०१४चा लॉर्ड्स कसोटी विजय, २०२१ला ऑस्ट्रेलियामध्ये आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका विजय. ऑस्ट्रेलियाच्या गाबा कसोटीमध्ये भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याने नाबाद ८९ धावांची खेळी केल्याने भारताने सामना आणि सलग दोन वेळा कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॉमनवेल्थ गेम्समधील विजेत्यांना भेटले पंतप्रधान; म्हणाले, ‘देश तुमच्यासाठी रात्र-रात्र जागलाय’
आयपीएल सामन्यावेळी संघमालकाने रॉस टेलरच्या कानशिलात लगावलेली! आता स्वत:च केलाय खुलासा
राशिदच्या खेळाला कोणाची लागली नजर? सध्याचा फॉर्म पाहून वाटेल हळहळ