भारतीय संघाचा बहुप्रतिक्षीत ऑस्ट्रेलिया दौरा शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) सुरु होणार आहे. या दौऱ्यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी सिडनी येथे खेळला जाणार असून या सामन्यात भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.१० ला सुरुवात होणार आहे. या सामन्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिलीप ह्यूजेसला श्रद्धांजली वाहणार आहेत. शुक्रवारी ह्यूजेसचे ६ वे पुण्यस्मरण आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ शुक्रवारच्या सामन्याआधी ६३ सेकंद मौन धारण करतील. ६३ सेकंद मौन पाळण्यामागचे कारण असे की ह्यूजेस त्याच्या शेवटच्या सामन्यात ६३ धावांवर नाबाद होता.
डोक्याला चेंडू लागून झाला होता मृत्यू –
२०१४ मध्ये शेफील्ड शील्ड स्पर्धेत सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर फलंदाजी करत असलेल्या २५ वर्षीय ह्यूजेसला सीन एबॉटने टाकलेला एक चेंडू लागला आणि तो जमिनीवर कोसळला. फलंदाजी दरम्यान ह्यूजेसने हेल्मेट परिधान केले होते पण चेंडू मानेच्या जवळ लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता.
या दुखापतीनंतर ह्यूजेसला लगेचच स्ट्रेचरवरुन मैदानातून बाहेर नेण्यात आले होते, तसेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण अखेर दुखापत झाल्याच्या तीन दिवसांनंतर २७ नोव्हेंबरला ह्यूजेसने अखेरचा श्वास घेतला होता.
अशी होती ह्यूजेसची कारकिर्द –
ह्यूजेसने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २६ कसोटी आणि २५ वनडे सामने खेळले होते. यामध्ये त्याने कसोटीत ३ शतके आणि ७ अर्धशतकांसह १५३५ धावा त्याने केल्या होत्या. तर वनडेमध्ये त्याने २ शतके आणि ४ अर्धशतकांसह ८२६ धावा केल्या होत्या.
भारतीय संघाविरुद्ध खेळण्याची होती संधी –
ह्यूजेसचे निधन झाले त्याचदरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी येणार होता. या मालिकेसाठी ह्यूजेसला ऑस्ट्रेलियन संघात संधीही मिळाली होती. मात्र त्याआधीच ह्यूजेसचे निधन झाले. त्याच्या निधनामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेन येथे 4 डिसेंबर पासून सुरु होणारा पहिला कसोटी सामनाही पुढे हलवण्यात आला होता. हा सामना नंतर 9-13 डिसेंबर दरम्यान ऍडलेड येथे पार पडला. या सामन्याआधी ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या खेळाडूंनी ह्यूजला श्रद्धांजली वाहिली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण
‘तीन विश्वचषकात यष्टीरक्षण करायचे आहे’, भारतीय क्रिकेटपटूने व्यक्त केली इच्छा
होय, आम्ही स्लेजिंग करणार! ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचे भारतीय संघाला खुले आव्हान
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक जास्त वेळा नाबाद राहणारे ३ भारतीय फलंदाज
ऑस्ट्रेलियन फलंदाजांना टी२०त सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता दाखवणारे टीम इंडियाचे ३ गोलंदाज
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच टी२० सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय धुरंदर