fbpx
Monday, January 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेव्हा राष्ट्रीय संघात निवड होत नाही, तेव्हा मनात शंका येते, युवा महिला हॉकीपटूची प्रतिक्रिया

Rashmita Minz believes in order to be a constant feature of the Indian women's hockey team

November 26, 2020
in हॉकी, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/TheHockeyIndia

Photo Courtesy: Twitter/TheHockeyIndia


भारतीय महिला हॉकी संघात स्थान मिळवण्याचे अनेक युवा हॉकीपटूंचे स्वप्न असते. त्यासाठी ते प्रचंड मेहनतही करतात.मात्र प्रत्येक खेळाडूला संधी मिळतेच असं नाही. ओडिसाच्या एका युवा महिला हॉकीपटूने जिद्द नाही चिकाटीच्या बळावर वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी भारतीय महिला हॉकी संघात स्थान मिळवले. तिने या संघातील आपले अनुभव सांगितले आहे.

मी नीतिमत्ता राखून माझे कार्य केले- रश्मिता

ओडिसाची युवा हॉकीपटू रश्मिता मिंज हिने 18 व्या वर्षीच भारतीय वरिष्ठ माहीला हॉकी संघात पदार्पण केले. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, “सन 2016 मध्ये वरिष्ठ हॉकी संघात पदार्पण केले तेव्हा मी खरोखरच लहान होते आणि तेव्हापासून या संघात खेळणे माझ्यासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. परंतु, मी नीतिमत्ता राखून माझे कार्य केले आणि सर्व राष्ट्रीय शिबिरांमध्ये मी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले.

..तेव्हा मनात शंका येते

“जेव्हा राष्ट्रीय संघात आपली निवड होत नाही, तेव्हा मनात शंका येते. संघातील माझ्या भूमिकेबद्दल आणि माझ्याकडून काय अपेक्षा आहे याविषयी मुख्य प्रशिक्षक सोजर्द मारिजणे माझ्याशी बोलले याबद्दल मी त्यांची आभारी आहे,” असेही पुढे बोलताना रश्मिता म्हणाली.

भारतीय संघाकडून अनेक पदके जिंकायचेत

तिच्या भविष्याबद्दल बोलताना रश्मिता म्हणाली की, “मला वाटते की या क्षणी माझे वय 22 वर्षे आहे. कमी वयाचा मला नक्कीच फायदा होईल. मला माहित आहे की मी बरीच वर्षे हॉकी खेळू शकते. मी अजूनही संघासाठी चांगले योगदान देऊ शकते. सन 2017 मध्ये जपानमधील काकामिगहारा येथे महिला आशिया चषक स्पर्धेमध्ये आम्ही सुवर्णपदक जिंकले होते. तो एक चांगला क्षण होता. भारतीय संघाकडून अधिक पदके जिंकण्याची संधी मला मिळवायची आहे.”

वरिष्ठ खेळाडूंबरोबर खेळण्यासाठी मिळवायची संधी

“बर्‍याच तांत्रिक बाबींवर मला काम करायचे आहे आणि माझी शारीरिक तंदुरुस्ती सुधारायची आहे. संघाच्या वरिष्ठ खेळाडूंबरोबर खेळण्याची मला अधिक संधी मिळवायची आहे, जेणेकरून खेळाबद्दलच्या विविध पैलूंबाबत आणि खेळाच्या बारीक सारीक गोष्टींबाबत मला शिकायला मिळेल” असेही पुढे बोलताना रश्मिता म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या –

“अनुभवी खेळाडूंमुळे मला खूप फायदा झाला”, भारताच्या नवोदित हॉकीपटूची प्रतिक्रिया

आजारी असलेल्या ‘या’ दिग्गज हॉकीपटूला सुनील गावसकर यांचा मदतीचा हात

खेळाडू क्रिकेटचे सामने खेळून घालवतात वेळ, भारतीय हॉकीपटूने एसएआयमध्ये राहण्याचा सांगितला अनुभव


Previous Post

Video – पालकत्व रजा घेतल्याबद्दल अखेर विराटने सोडले मौन, म्हणाला…

Next Post

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाने अवलंबवावी ‘ही’ त्रिसूत्री

Related Posts

Screengrab: Twitter/ cricketcomau
क्रिकेट

व्वा काय डोकं चालवलंय! चेंडू चमकवण्यासाठी मयंकने शार्दुलच्या हातावर घासला चेंडू, पाहा व्हिडिओ

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

शब्बास रे पठ्ठ्या! सिराजने पदार्पणाची मालिका खेळतानाच मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीतील दमदार कामगिरीनंतर सिराजची प्रतिक्रिया, ‘या’ कारणासाठी मानेल रहाणेचे आभार

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाने शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरवर उधळली स्तुतीसुमने; म्हणाला….

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

यावर्षी आशिया कप स्पर्धा भारताविनाच? ‘या’ कारणामुळे माजी विजेत्यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

दोन वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करताना पहिल्याच चेंडूवर विकेट घेतल्यानंतर शार्दुलने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

January 18, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ BCCI

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाने अवलंबवावी 'ही' त्रिसूत्री

Photo Courtesy: Twitter/FIFAWorldCup

भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने मॅराडोना यांच्यामुळे १० नंबरची जर्सी घालायला केली होती सुरुवात

आयएसएल २०२०: नॉर्थईस्टची दोन गोलांच्या पिछाडीवरून ब्लास्टर्सविरुद्ध बरोबरी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.