---Advertisement---

खेळाडू क्रिकेटचे सामने खेळून घालवतात वेळ, भारतीय हॉकीपटूने एसएआयमध्ये राहण्याचा सांगितला अनुभव

On: शुक्रवार, नोव्हेंबर 20, 2020 11:09 PM
---Advertisement---

बंगळुरू। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतीय हॉकी संघाने 6 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सराव सुरू केला. भारतीय पुरुष हॉकी संघातील खेळाडू फॉर्म आणि तंदुरुस्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

खेळाडू आहेत जैव सुरक्षित वातावरणात

बंगळुरूमधील एसएआय येथे खेळाडू कसून सराव करत आहेत. कोरोना या साथीच्या आजारामुळे खेळाडू जैव सुरक्षित वातावरणात वास्तव्यास आहे.

हळू हळू गाठत आहोत खेळाची पातळी

या कठीण काळातही खेळाडू उत्तम पद्धतीने सराव करत आहेत. याबद्दल बोलताना भारतीय हॉकी संघाचा डिफेंडर गुरिंदर सिंग म्हणाला की, “लॉकडाऊननंतर आम्ही हळूहळू खेळाची पातळी गाठत आहोत. ऑक्टोबर महिन्यात सरावाचा कालावधी वाढवला होता. नोव्हेंबरमध्येही आम्ही त्याच प्रकारे सराव सुरू ठेवला. आम्हाला खेळात गती आणि तंदुरुस्ती मिळवण्यात याचा फायदा झाला आहे.”

व्हॉलीबॉल, क्रिकेटचे सामने खेळून खेळाडू घालवतात वेळ

एफआयएच पुरुष हॉकी विश्वविजेत्या संघाचा भाग असलेल्या गुरिंदर सिंगने पुढे बोलताना सांगितले की, “आता आपण जैव सुरक्षित वातावरणात राहतो त्यामुळे आपल्याला विश्रांती करण्याचे आणि स्वतःला ताजेतवाने ठेवण्याचे नवीन मार्ग शोधावे लागतात. आमच्यातील काही खेळाडू संगीत ऐकतात, चित्रपट पाहतात किंवा पुस्तके वाचतात. काहीजण एसएआयमधील विविध सुविधांचा शोध घेतात. एसओपीच्या सर्व मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन खेळाडू व्हॉलीबॉल, फुटबॉल किंवा अगदी क्रिकेटचेही सामने खेळतात. प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी कधी- कधी शनिवारी व रविवारी गोल्फ खेळतात आणि आमच्यातीलही काही खेळाडू गोल्फ खेळण्याचाही आनंद घेतात.”

वाचा-

कोरोनामुळे घरी न परतण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय हॉकीपटूने हॉस्टेलमध्ये ‘असा’ घालवला वेळ

हॉकी इंडियाने केली मास्टर समितीची स्थापना; सर्व वयोगटातील खेळाडूंना मिळेल संधी

“सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर पुरस्कार आपल्याला मिळतो” एकलव्य पुरस्कार विजेत्या हॉकीपटूची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---