बेंगलोर | यावर्षी (सन 2020) जूनमध्ये भारतीय पुरुष आणि महिला हॉकी कोअरच्या संभाव्य गटांना देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे कुटुंबियांसमवेत विश्रांती घेण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक सूरज करकेरा याने एसएआय, बेंगलोर येथे राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे पालक मुंबईत राहतात आणि तिथे कोविड-19 चे प्रकरणे जास्त आहेत. एसएआयमध्ये या काळात त्याने पुस्तके वाचण्यात आणि मागील वर्षातील सामने पाहण्यात बहुतांश वेळ आपल्या खोलीत घालवला.
दुर्दैवाने, सहा आठवड्यांच्या विश्रांतीनंतर जेव्हा ऑगस्टमध्ये त्याचे संघ सहकारी परतले, तेव्हा त्याला डेंग्यूमुळे शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबद्दल बोलताना सुरज म्हणाला, “हे वर्ष माझ्यासाठी रोलर कोस्टर राईडसारखे ठरले आहे. मी एसएआयमध्येच रहाण्याचा निर्णय घेतला होता. कारण मला वाटले की मुंबईचा प्रवास माझ्यासाठी सुरक्षित नाही, कारण तिथे कोविड-19 ची बरीच प्रकरणे आहेत. पण तसे घडले नाही. जेव्हा आम्ही शिबिर पुन्हा सुरू करण्यासाठी एकत्र आलो तेव्हाच मला डेंग्यूची लागण झाली. आता मी माझ्या तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रीत करत आहे.”
या संपूर्ण काळात कोचिंग स्टाफचा पाठिंबा मिळाला त्यामुळे सुरज स्वतःला भाग्यवान समजतो. तो म्हणाले की, “जेव्हा मी वसतिगृहात एकटा होतो, तेव्हा आमचे मुख्य प्रशिक्षक आणि वैज्ञानिक सल्लागार यांनी माझी सतत तपासणी केली. दहा महिन्यांपेक्षा जास्त काळ त्यांच्या कुटुंबीयांना न भेटणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. मला वैयक्तिकरित्या वाटते की या वर्षी आपण बरेच काही शिकलो. आयुष्यात काहीही घडू शकते. या दृष्टीने त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या बलवान असले पाहिजे.”
“राष्ट्रीय कोचिंग शिबिरात सरदारसिंगसारख्या मोठया खेळाडूंसोबत वेळ घालवल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्याला खूप अनुभव आहे. आता श्रीजेश, मनप्रीत, सुनील, आकाशदीप इत्यादी ज्येष्ठ खेळाडूंकडून मला बरेच काही शिकायला मिळाले. ते नेहमीच मला मैदानात आणि मैदानाबाहेरही मार्गदर्शन करीत आहेत. आता माझे लक्ष माझे कौशल्य सुधारणे, पुढील सामन्यांसाठी तयार असणे आणि संघ निवडीसाठी प्रयत्न करणे याच्यावर असेल.” असे पुढे बोलताना सुरज म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
हॉकी इंडियाने केली मास्टर समितीची स्थापना; सर्व वयोगटातील खेळाडूंना मिळेल संधी
“स्ट्रायकर होण्यासाठी शारीरिक शक्ती महत्वाची”, २१ वर्षीय प्रतिभावान हॉकीपटूची प्रतिक्रिया