---Advertisement---

हॉकी इंडियाने केली मास्टर समितीची स्थापना; सर्व वयोगटातील खेळाडूंना मिळेल संधी

On: बुधवार, नोव्हेंबर 18, 2020 7:34 AM
---Advertisement---

नवी दिल्ली | मार्च 2020 मध्ये हॉकी इंडिया जागतिक मास्टर्स हॉकी (डब्ल्यूएमएच) सदस्य म्हणून जगभरातील 38 अन्य राष्ट्रीय संघटनांमध्ये सामील झाली.

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (एफआयएच) द्वारा मान्यता प्राप्त डब्ल्यूएमएच ही एकमेव मास्टर्स संस्था आहे. जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय मास्टर्स हॉकी आयोजित करण्यासाठी ही संस्था जबाबदार आहे.

राज्य स्तरावर जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हॉकी इंडियाने त्यांच्या सर्व राज्य सदस्य संघटनांना राज्य स्तरावरील नेतृत्व करण्यासाठी माजी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडूंची कार्यकारी समिती स्थापन करण्यास प्रोत्साहित केले. हा उपक्रम सर्व वयोगटातील खेळाडूंना म्हणजे मुला मुलींना खेळाची आवड कायम ठेवण्यासाठी आणि वयाच्या बंधनाची पर्वा न करता खेळात सक्रिय राहण्याची संधी प्रदान करेल.

हॉकी इंडिया राज्य सदस्य विभाग यांनी या राज्य मास्टर समितीची स्थापना केली आहे. देशभरातील मास्टर हॉकीला चालना देण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी ही समिती कार्य करेल. हॉकी इंडिया सदस्य युनिट पोर्टलवर विविध वयोगटातील सर्व मास्टर ऍथलीट्स नोंदणीकृत असल्याची खात्री करणे ही समितीची पहिली जबाबदारी असेल. राज्य सदस्य युनिटच्या समितीतील काही सदस्यांमध्ये भारताचे माजी कर्णधार परगट सिंग, मीर रंजन नेगी, गुरबक्स सिंग, बीरबहादुर छत्री यांच्या समावेश आहे.

देशातील विविध मास्टर्स हॉकी स्पर्धांना प्रोत्साहन देण्याची, त्यांची योजना आखण्याची व अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने हॉकी इंडिया मास्टर्स कमिटी बनवली आहे. त्यामुळे माजी खेळाडूंना त्यांचा आवडता खेळ खेळन्याची पुन्हा संधी मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या –

“सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर पुरस्कार आपल्याला मिळतो” एकलव्य पुरस्कार विजेत्या हॉकीपटूची प्रतिक्रिया

“स्ट्रायकर होण्यासाठी शारीरिक शक्ती महत्वाची”, २१ वर्षीय प्रतिभावान हॉकीपटूची प्रतिक्रिया

“मिळालेल्या ब्रेकमुळे चुका सुधारण्यावर विचार करण्याची संधी मिळाली”, भारतीय महिला हॉकी मिडफिल्डरची प्रतिकिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---