---Advertisement---

‘तीन विश्वचषकात यष्टीरक्षण करायचे आहे’, भारतीय क्रिकेटपटूने व्यक्त केली इच्छा

On: गुरूवार, नोव्हेंबर 26, 2020 6:52 PM
---Advertisement---

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला शुक्रवारपासून सिडनी येथे वनडे मालिकेने सुरुवात होत आहे. या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलवर सोपवली गेली आहे. आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व करणाऱ्या केएल राहुलसाठी हा नवीन अनुभव असेल. केएल राहुलने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याविषयीच्या अनेक प्रश्नांना व्हिडिओ पत्रकार परिषदेत उत्तरे दिली.

फलंदाजी आणि यष्टीरक्षणाविषयी केली चर्चा

कोविड-१९ च्या कडक नियमांमुळे, पारंपारिक पत्रकार परिषदेला बगल देऊन भारतीय संघाच्या रणनीतीविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पत्रकार परिषद आयोजित केली गेली होती. त्या पत्रकार परिषदेतील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना राहुलने उत्तरे दिली.

तुला कोणत्या क्रमांकावर खेळायला आवडेल, या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल म्हणाला, “माझ्या फलंदाजीचा क्रम संघ व्यवस्थापन ठरवेल. कदाचित, संघाची गरज आणि मालिकेचा प्रकार पाहून माझ्या क्रमांकात फेरबदल होऊ शकतो. यापूर्वी मी जेव्हा वनडे क्रिकेट खेळलो होतो, तेव्हा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. सोबतच, यष्टीरक्षण देखील केले होते. संघ देईल ती जबाबदारी पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील.”

भविष्यातही जबाबदारी घेऊन खेळण्याचा प्रयत्न करेल

भारतीय संघाच्या भविष्यातील योजनांविषयी बोलताना राहुल म्हणाला, “पुढील विश्वचषकातसुद्धा मला यष्टीरक्षण करायला आवडेल. एक संघ म्हणून आम्ही इतका दूरचा विचार केला नाही. मात्र, संधी मिळाल्यास मी यष्टीक्षणासाठी तयार आहे.”

भारतीय संघाला पुढील तीन वर्षात तीन विश्वचषक खेळायचे आहेत. २०२१ मध्ये भारतात व २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषकांचे आयोजन केले जाईल. त्यानंतर, २०२३ मध्ये वनडे विश्वचषक भारतात खेळविण्यात येणार आहे.

न्यूझीलंडमध्ये राहुलने केली होती चमकदार कामगिरी

या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौर्‍यावर केएल राहुलने चमकदार कामगिरी केली होती. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने १०२ च्या अविश्वसनीय सरासरीने २०४ धावा कुटल्या होत्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकलेले. सोबतच, त्याचा स्ट्राईक रेट ११० हून जास्त होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.

आयपीएल २०२० मध्ये ठोकल्या होत्या सर्वाधिक धावा

नुकत्याच संपलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामातही राहुलने जबरदस्त कामगिरी नोंदवली होती. किंग इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व करताना त्याने १४ सामन्यातून ६६८ धावा ठोकल्या होत्या. स्पर्धेतील सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला दिली जाणारी ‘ऑरेंज कॅप’ राहुलने पटकावलेली. सोबतच, ‘गेमचेंजर ऑफ द सीजन’ चा पुरस्कारही त्याला मिळाला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

होय, आम्ही स्लेजिंग करणार! ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचे भारतीय संघाला खुले आव्हान

जसप्रीत बुमराह देतोय युवा कार्तिक त्यागीला गोलंदाजीचे धडे, पाहा फोटो 

पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या मागची साडेसाती थांबेना, न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेले ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

ट्रेंडिंग लेख – 

ऑस्ट्रेलियन फलंदाजांना टी२०त सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता दाखवणारे टीम इंडियाचे ३ गोलंदाज

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच टी२० सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय धुरंदर

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक जास्त वेळा नाबाद राहणारे ३ भारतीय फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---