भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 399 धावा उभारल्या. त्यानंतर पावसामुळे ऑस्ट्रेलियासमोर त्यांच्या 9 षटकानंतर 33 षटकात 317 धावांचे आव्हान दिले गेले होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीने ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ 217 धावांमध्ये संपुष्टात आला. यासह भारतीय संघाने 99 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
(India Beat Australia By 99 Runs Shubman Shreyas Ashwin Shines)