दुबळ्या आयर्लंड संघाने अखेरच्या षटकांत जोरदार फलंदाजी करत भारतीय संघासमोर उभे केलेले 108 धावांचे आव्हान टीम इंडियाच्या शिलेदारांनी अवघ्या 9.2 षटकांत पूर्ण करत पहिल्याच टी20 सामन्यात शानदार विजय मिळवला.
भारत आणि आयर्लंड ( IRE vs IND ) यांच्यातील दोन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी 26 जून रोजी झाला. पावसाच्या व्यत्ययाने थोडा उशीरा सुरू झालेला हा सामना फक्त 12-12 षटकांचा खेळवण्याचा निर्णय झाला. टाॅस जिंकून भारताने स्विकारलेले क्षेत्ररक्षण आणि पावसामुळे झालेला वातावरणीय बदल याचा पुरेपूर फायदा टीम इंडियाने उचलला.
Taking Ireland by a 🔥! First one in the bag! 🥳#IREvIND #Yellove #WhistlePodu 🦁💛 📸 : @BCCI pic.twitter.com/obiAeh2dZr
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) June 26, 2022
भारताने पहिल्यांदा गोलंदाजी केली. यात टीम इंडियाच्या गोलंदाजी करत पहिल्या षटकापासूनच आयर्लंड संघाला दबावात टाकले. पहिल्याच ओव्हरमध्ये भुवनेश्वरने आयर्लंडचा सलामीवीर तंबूत पाठवला. पाठोपाठ कर्णधार हार्दिक पांड्यानेही ( Captain Hardik Pandya ) विकेट घेतली. एकापाठोपाठ एक जाणाऱ्या विकेट्समुळे आयर्लंड संघ बॅकफूटवर गेला. परंतू हॅरी टेक्टोर 64 (33) याच्या शानदार खेळीने यजमानांनी पाहुण्या संघाला 108 धावा करत 109 धावांचे आव्हान दिले.
प्रत्युत्तरात भारताच्या बिनीच्या शिलेदारांनी पहिल्या षटकापासूनच आयर्लंडच्या गोलंदाजांना चोपायला सुरूवात केली. इशान किशनच्या 11 चेंडूत 26 धावांच्या वादळी खेळीने आयर्लंड पुरता खिळखिळा झाला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या 24 (12) आणि शेवटी दीपक हुड्डाची मॅचविनिंग खेळी 47 (29) यामुळे अवघ्या 9.2 षटकातच भारताने दोन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
1ST T20I. India Won by 7 Wicket(s) https://t.co/V1IMXtpbkp #IREvIND
— BCCI (@BCCI) June 26, 2022
भारताचा आयर्लंड विरूद्धचा अखेरचा टी20 सामना 28 जून रोजी डबलीन इथेच होणार आहे.
( India beat Ireland by seven wickets in rain-hit 1st T20I )
अधिक वाचा
अखेर उमरानला संधी मिळालीच! आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात करणार पदार्पण
मुंबईचे ४२ व्या रणजी ट्रॉफीचं स्वप्न चकणाचूर, ‘या’ पाच खेळाडूंनी नाही केले अपेक्षित प्रदर्शन
‘रोहित नसला तर विराटला करा कॅप्टन’, ट्वीटरवर चाहत्यांची एकसुरात मागणी