प्रत्येकजण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या एखाद्या गोष्टीचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतो. तसेच, त्या आनंदाची बातमी चाहत्यांना देण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळी पद्धत वापरतो. काहीजण थेट सोशल मीडियावर पोस्ट किंवा स्टोरी टाकून चाहत्यांना माहिती देतात, पण भारतीय स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री याने त्याचा आनंद चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी खास पद्धत वापरली आहे. त्याची ही पद्धत सर्वांना भावत आहे. यादरम्यानचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारतीय स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने चाहत्यांसोबत आपला आनंद शेअर केला आहे. लवकरच सुनील छेत्री वडील (Sunil Chhetri Father) बनणार आहे. सोमवारी (दि. 12 जून) इंटरकॉन्टिनेंटल चषकात भारत विरुद्ध वानुअतू (India vs Vanuatu) संघ आमने-सामने होते. या सामन्यात भारताने 1-0ने विजय मिळवला. भारतासाठी एकमेव गोल करण्याचा मान सुनीलला मिळाला. हा गोल केल्यानंतर सुनील छेत्री खास सेलिब्रेशन (sunil chhetri special celebration) करताना दिसला. यामार्फत त्याने वडील बनणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.
काय होती सेलिब्रेशन स्टाईल?
खरं तर, सुनील छेत्री याने फुटबॉल आपल्या टी-शर्टखाली पोटावर लपवत खास सेलिब्रेशन केले. यानंतर त्याने पत्नीकडे पाहून दोन्ही हातांनी चेंडू वर उचलला. यामधून सुनील सांगू इच्छित होता की, त्याची पत्नी प्रेग्नंट आहे.
.@chetrisunil11‘s left footed finish takes the #BlueTigers ???? to the #HeroIntercontinentalCup ???? FINAL ????????#VANIND ⚔️ #IndianFootball ⚽️ pic.twitter.com/1n081IsM4I
— Indian Football Team (@IndianFootball) June 12, 2023
पत्नीनेही केला टाळ्यांचा गजर
या सामन्यानंतर सुनील म्हणाला की, “मी आणि माझी पत्नी बाळाची आशा करत आहोत. हा आनंद शेअर करण्यासाठी अनेक गोष्टी मनात सुरू होत्या, पण आम्ही अशाप्रकारे आनंदाची बातमी देण्याचा निर्णय घेतला. आम्हाला आधीच अनेक मेसेज आणि शुभेच्छा मिळत होत्या.” या खास क्षणी मोठ्या पडद्यावर त्याची पत्नीही टाळ्यांचा गजर करताना दिसली.
.@chetrisunil11 had a very special message for #IndianFootball ????⚽️????#HeroIntercontinentalCup ???? #VANIND ⚔️ #BlueTigers ???? pic.twitter.com/NTFEPHQCzY
— Indian Football Team (@IndianFootball) June 12, 2023
सुनीलचा गोल आणि भारत अव्वलस्थानी
कलिंगा स्टेडिअमवर सुनीलने वानुअतू संघाविरुद्ध 81व्या मिनिटाला दणदणीत गोल केला. त्याने अंतिम सामन्यात जागा मिळवण्यासाठी भारताला मजबूत स्थितीत आणले. भारताने यापूर्वी शुक्रवारी (दि. 10 जून) पहिल्या सामन्यात मंगोलियाला 2-0ने पराभूत केले होते. दोन विजयांसह सहा गुण घेत भारत सध्या गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. भारताचा अखेरचा राऊंड-रॉबिन लीग सामना गुरुवारी (दि. 15 जून) लेबननविरुद्ध होणार आहे. (india beat vanuatu sunil chhetri is about to become father shared news by showing special celebration intercontinental cup read)
महत्वाच्या बातम्या-
इंटर कॉन्टिनेन्टल फुटबॉल कपमध्ये ‘ब्लू ब्रिगेड’ ची विजयी सुरुवात! समद-छांगते ठरले विजयाचे शिल्पकार
अखेर प्रतिक्षा संपली! PSG ला रामराम करत मेस्सीने ‘या’ संघाशी केला करार