झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची सोमवारी (२२ ऑगस्ट) समाप्ती झाली. हरारे येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने यजमान झिम्बाब्वेला १३ धावांनी पराभूत करत मालिका ३-० अशा फरकाने आपल्या नावे केली. भारतासाठी शतकी खेळी करणारा युवा फलंदाज शुबमन गिल याला सामनावीर व मालिकावीर अशा दोन्ही पुरस्काराने सन्मानित केले गेले.
3RD ODI. India Won by 13 Run(s) https://t.co/X4aLV4pT7I #ZIMvIND
— BCCI (@BCCI) August 22, 2022
मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने आधीच मालिका आपल्या खिशात घातली होती. या तिसऱ्या औपचारिक सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार केएल राहुलने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राहुल व शिखर धवन यांनी ६३ धावांची सलामी देत चांगली सुरुवात केली. मात्र, या दोघांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यानंतर आलेल्या शुबमन गिल व ईशान किशन यांनी डावाची सूत्रे आपल्याकडे घेतली. दोघांनी १४० धावांची शानदार भागीदारी केली. ईशान अर्धशतक झळकावून लगेच माघारी परतला. मात्र, गिलने आक्रमण व संयम यांचा मेळ साधत आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक साजरे केले. त्याच्या १३० धावांच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ८ बाद २८९ धावा उभारल्या. झिम्बाब्वेसाठी ब्रॅड इवान्सने पाच बळी आपल्या नावे केले.
Third century in the last six ODIs for Sikandar Raza 🔥
He is playing a match-winning knock for his team 👏#ZIMvsIND #Cricket #SikandarRaza pic.twitter.com/PegWqqOXP0
— Wisden India (@WisdenIndia) August 22, 2022
भारताने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान संघाला ७ धावांवर पहिला धक्का बसला. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला काईया झटपट तंबूत परतला. त्यानंतर अनुभवी विल्यम्स देखील रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला. त्याने पुन्हा मैदानात येत ४५ धावांची खेळी केली. इतर फलंदाज सातत्याने बाद होत असताना अनुभवी सिकंदर रझाने एक बाजू लावून धरली. त्याला नवव्या क्रमांकावरील ब्रॅड इवान्सने साथ दिली. या दोघांनी आठव्या गड्यासाठी १०४ धावांची मोठी भागीदारी केली. दरम्यान रझाने आपल्या कारकिर्दीतील तिसरे वनडे शतक पूर्ण केले.
अखेरच्या दोन षटकात विजयासाठी १७ धावांची आवश्यकता असताना रझा बाद झाला. अखेरच्या षटकात इतर फलंदाजांना अपेक्षित धावा न करता आल्याने त्यांना १३ धावांनी पराभूत व्हावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टी२० विश्वचषकाबाबत मोठी बातमी समोर, ‘या’ देशात केलं जाणार आयोजन
रोहितच्या म्हणण्याने नाही, तर ‘या’ तारखेच्या बैठकीत ठरणार टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ
उधारीची जर्सी घालणाऱ्या धवनकडे चाहत्याने मागितला शर्ट, गब्बरची रिएक्शन पाहून तुम्हीही म्हणाल…