---Advertisement---

कोहलीच्या टीम इंडियाचा विश्वविक्रम; कोणालाही न जमलेली गोष्ट करुन दाखवली!

On: रविवार, नोव्हेंबर 24, 2019 2:54 PM
---Advertisement---

कोलकता। भारत विरुद्ध बांगलादेश संघात इडन गार्डनवर पार पडलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने एक डाव 46 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने एक मोठा विश्वविक्रम रचला आहे.

भारताने कसोटी क्रिकेटमध्ये एका डावाने मिळवलेला हा सलग चौथा विजय होता. त्यामुळे सलग चार कसोटी सामने एका डावाने जिंकणारा भारत जगातील पहिलाच संघ ठरला आहे.

भारताने या सामन्याआधी इंदोरला झालेला बांगलादेश विरुद्धचा पहिला कसोटी सामनाही एका डावाने जिंकला होता. तसेच त्याआधी भारताने ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुण्यात आणि रांचीला झालेले कसोटी सामनेही एका डावाने जिंकले होते.

यामुळे विराट कोहलीही सलग चार कसोटी सामने एका डावाने जिंकणारा पहिलाच कर्णधारही ठरला आहे.

भारताच्या शेवटचे 4 कसोटी सामने – 

विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पुणे – एक डाव 137 धावांनी विजय

विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रांची – एक डाव 202 धावांनी विजय

विरुद्ध बांगलादेश, इंदोर – एक डाव 130 धावांनी विजय

विरुद्ध बांगलादेश, कोतकाता – एक डाव 46 धावांनी विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---