सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज (6 जानेवारी) पावसाच्या व्यत्ययामुळे 25.2 षटकांचाच खेळ होऊ शकला आहे. आज चौथ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद 6 धावा केल्या आहेत.
सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला होता. त्याच्या प्रतिउत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सर्वबाद 300 धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे या सामन्यात भारताने पहिल्या डावातील 322 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला आहे.
विशेष म्हणजे भारतीय संघाने कसोटीत 600 पेक्षा अधिक धावा करण्याची ही 32 वेळ आहे आणि भारत याआधी 600 पेक्षा अधिक धावा केल्यानंतर कधीही पराभूत झालेला नाही.
या सिडनी कसोटीआधी 600 पेक्षा अधिक धावा केलेल्या 31 सामन्यांपैकी 17 सामन्यात विजय मिळवला आहे, तर 14 सामने अनिर्णीत राहिले आहेत. त्याचबरोबर परदेशात खेळताना भारताने 12 वेळा 600 धावांचा टप्पा कसोटीत पार केला आहे. यापैकी 6 सामने भारताने जिंकले आहेत. तर 6 सामने अनिर्णीत राहिले आहेत.
त्याचबरोबर कसोटीत सर्वाधिक वेळा 600 धावांचा टप्पा पार करणाऱ्या संघाच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर असून त्यांनी 34 वेळा कसोटीत 600 धावांचा टप्पा पार केला आहे.
भारताने पहिल्यांदा फेब्रुवारी 1979 मध्ये कसोटीत 600 धावसंख्या पार केली होती. त्यामुळे त्यानंतर सर्वाधिक वेळा भारतानेच 600 धावांचा टप्पा कसोटीत पार केला आहे. ऑस्ट्रेलियाने फेब्रुवारी 1979 नंतर 19 वेळा 600 धावांचा टप्पा पार केला आहे.
कसोटीमध्ये सर्वाधिकवेळा 600 पेक्षा जास्त धावा करणारे संघ –
34 – ऑस्ट्रेलिया
32 – भारत
20 – इंग्लंड/विंडीज
15 – पाकिस्तान
13 – श्रीलंका
12 – दक्षिण आफ्रिका
7 – न्यूझीलंड
1 – बांगलादेश
महत्त्वाच्या बातम्या:
–३३ वर्षांनंतर थायलंडवर विजय मिळवण्यास टीम इंडिया उत्सुक
–कोहलीच्या टीम इंडियाने सहाव्यांदा दिला विरोधी संघाला फॉलोऑन, काय आहे याआधीचा इतिहास?
–कोणत्याच भारतीय गोलंदाजाला जमले नाही ते कुलदिप यादवने केले
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग २० – चिरतरुण जाफर