भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील तिसरा सामना गाबा येथे अनिर्णित राहिला. बाॅर्डर गावस्कर मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथी कसोटी 26 डिसेंबरपासून ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवली जाणार आहे. ही बॉक्सिंग डे टेस्ट आहे. एमसीजी मध्ये दरवर्षी बॉक्सिंग डे कसोटी खेळली जात आहे. बॉक्सिंग डे टेस्ट हा सामना 26 डिसेंबरला म्हणजेच ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवसापासून सुरु होणार आहे. या बातमीद्वारे जाणून घेऊयात ऑस्ट्रेलियन भूमीवर बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाचा विक्रम कसा आहे?
भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात 9 बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळले आहेत. दोन्ही संघांमधील पहिली बॉक्सिंग डे कसोटी 1985 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळली गेली. जी अनिर्णित राहिली. तेव्हा भारताची कमान कपिल देव यांच्याकडे होती आणि ऑस्ट्रेलियाचे कर्णधार ॲलन बॉर्डर होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध सलग पाच बॉक्सिंग डे कसोटी जिंकल्या. यानंतर 2014 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली एमसीजीमध्ये खेळलेला सामना अनिर्णित राहिला. या ठिकाणी 33 वर्षे बॉक्सिंग डे कसोटीत भारताला विजयाचा आनंद मिळाला नाही.
तब्बल 33 वर्षे विजयासाठी आसुसलेल्या भारताने यानंतर दुहेरी खळबळ उडवून दिली. एमसीजीमध्ये भारताने शेवटच्या दोन सामन्यांमध्ये विजयाचा झेंडा फडकावला आहे. अशा परिस्थितीत जेव्हा टीम इंडिया यंदा या मैदानात उतरेल तेव्हा संघाचा उत्साह अधिक असेल. 2018 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी पराभव केला. त्यानंतर भारताने 2020 मध्ये एमसीजी येथे ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव केला. त्यावेळी अजिंक्य रहाणे भारताची धुरा सांभाळत होता. 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एक कसोटी खेळल्यानंतर कोहली पर्सनल कारणामुळे भारतात परतला होता. त्यानंतर उर्वरित तीन सामन्यांमध्ये रहाणेने कर्णधारपद भूषवले.
गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर टेल-एंडर फलंदाजांच्या लढाऊ भावनेचे कौतुक करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की यामुळे उर्वरित सामन्यांसाठी संघाला आत्मविश्वास मिळाला आहे. गाबा येथे सलामीवीर केएल राहुलच्या 84 धावा केल्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाने 77 धावांची खेळी केली. यानंतर आकाश दीप (31) आणि जसप्रीत बुमराह (नाबाद 10) यांनी अखेरच्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी करून भारताला फॉलोऑनपासून वाचवले. रोहित म्हणाला, ‘जडेजा आणि राहुलचे कौतुक करावे लागेल. यानंतर आकाश दीप आणि बुमराहने दाखवलेली फायटिंग स्पिरिट पाहून बरे वाटले.
हेही वाचा-
निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी अश्विन चेन्नईत पोहचला, घरी भावनिक स्वागत; पाहा VIDEO
‘अश्विन’ची निवृत्ती ही तर फक्त सुरुवात, आगामी काळात संघात मोठे बदल होणार
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियात होणार महत्त्वाचे बदल! अहवालात मोठा खुलासा