नुकत्याच जाहीर झालेल्या यादी नुसार भारतीय फुटबॉल संघाने १०० व्या स्थानी झेप घेतली आहे. ही झेप जरी खूप नसली तरी महिन्याभरापूर्वीच आलेल्या नवीन क्रमवारीत भारत १०१ व्या स्थानी विराजमान झाला होता आणि आता लगेच १०० व्या स्थानी येऊन बसला आहे.
२१ वर्षात पहिल्यांदाच भारत १०० च्या टप्प्यात आला आहे, या पूर्वी १९९६ साली भारत ९६ व्या क्रमांकावर होता जो आजवरचा सर्वोत्तम आहे. भारताच्या कंबोडिया आणि म्यानमार यांच्यावर मिळवलेल्या विजयामुळे हे शक्य झाले.
सध्या क्रिकेट सोबतच फुटबॉलचे देखील प्रचंड वेड आहे. भारतात सुरु असलेल्या दोन लिग देखील या गोष्टीला कारणीभूत आहेत. आयएसएल आणि आय-लीगमुळे फुटबॉलचा भारतातला चाहता वर्ग निर्माण झाला आणि शिवाय आंतरराष्ट्रीय क्लब आणि संघ देखील आहेतच.
आता सर्व जण आतुरतेने एकाच गोष्टीची वाट बघतील की केव्हा भारत आपल्या आधीच्या क्रमवारीच्या पुढे जातो आणि इतिहास घडवतो.