ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी खेळाडू ब्रॅड हॉग यांचा असा विश्वास आहे की, सध्याच्या इंग्लंड दौऱ्यात (ENG vs IND) लॉर्ड्स कसोटी सामना भारतासाठी सर्वात मोठे आव्हान असेल. भारतीय संघाने २०१४ मध्ये लॉर्ड्समध्ये दणदणीत विजय मिळवला होता. परंतू, त्यानंतरच्या दौऱ्यात त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामना १२ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
भारतीय संघ पूर्ण आत्मविश्वासाने लॉर्ड्स कसोटीत उतरेल. कारण पहिल्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे संघ विजयाचा प्रबळ दावेदार होता. परंतू, पावसामुळे शेवटच्या दिवशी खेळ शक्य झाला नाही आणि सामना अनिर्णीत सुटला. ब्रॅड हॉगला असे वाटते की, कागदावर भारत इंग्लंडपेक्षा मजबूज संघ दिसून येत आहे. त्याने लॉर्ड्स कसोटीला पाहुण्यांसाठी ‘मालिकेतील सर्वात मोठा सामना’ असे म्हटले आहे.
त्याच्या यूट्युब (YouTube) चॅनेलवर याबद्दल बोलताना हॉग म्हणाला, “कागदावर भारत इंग्लंडपेक्षा चांगला संघ आहे. हा विशेष लॉर्ड्स कसोटी सामना हा मालिकेतील त्यांचा सर्वात मोठा धोका आहे. जर त्यांनी हा सामना जिंकला तर त्यांना इंग्लंडला व्हाईटवॉश करण्याची मोठी संधी आहे. जर ते हरले तर, थोडी शंका निर्माण करेल आणि इंग्लंडला खरोखरच शीर्षस्थानी जाण्याची आणि मालिका भारतापासून दूर नेण्याची संधी देईल. हा मालिकेतील सर्वात मोठा सामना आहे.”
गेल्या इंग्लंड दौऱ्यात लॉर्ड्सवर भारताला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता
भारताच्या २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सवर खेळला गेला होता. ज्यामध्ये भारतीय फलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. प्रथम फलंदाजी करताना भारताला फक्त १०७ धावा करता आल्या होत्या. जेम्स अँडरसनने जबरदस्त गोलंदाजी करताना ५ बळी घेतले होते. यानंतर इंग्लंडने ३९६ धावा केल्यावर पहिला डाव घोषित केला होता.
दुसऱ्या डावातही भारताचे फलंदाज फ्लॉप ठरले आणि जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या घातक गोलंदाजीसमोर संपूर्ण संघ १३० धावांवर बाद झाला होता. अशाप्रकारे इंग्लंडने एक डाव आणि १५९ धावांनी सामना जिंकला होता. सध्याच्या दौऱ्यात, भारतीय संघाला १२ ऑगस्टपासून लॉर्ड्सवर मालिकेची दुसरी कसोटी खेळायची आहे. यावेळी जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या सामन्यात नसतील. त्यामुळे भारतीय संघाकडे विजयाची पुरेपूर संधी असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडला जबर धक्का! स्टुअर्ट ब्रॉड भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, कारण घ्या जाणून
कधी, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना? जाणून घ्या एका क्लिकवर
आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामापूर्वी शुभमन गिलने बदलला आपला पूर्ण लूक, व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल