भारतीय संघाचा स्टार कर्णधार विराट कोहली सध्या कसोटीत ८८६ गुणांसह दुसऱ्या, वनडेत ८६९ गुणांसह पहिला तर ६७३ गुणांसह टी२०मध्ये १०व्या स्थानावर आहे.
परंतु हाच भारतीय संघाचा मोठा खेळाडू ६ ऑगस्ट २०१८ रोजी कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी विराजमान झाला होता होता. तेव्हा त्याचे कसोटीत ९३४ गुण तर दुसऱ्या स्थानी असलेल्या स्टीव स्मिथचे ९२९ गुण होते.
जून २०११मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला होता. त्यानंतर प्रथमच एखादा भारतीय खेळाडू या स्थानावर विराजमान झाला होता.
त्या दिवशी विराटच्या नावावर एक खास विक्रमही झाला होता. कसोटी व वनडे क्रिकेटमध्ये एकाच वेळी अव्वल स्थानावर विराजमान होणाऱ्या मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये त्याचा समावेश झाला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील तेव्हा ९वा खेळाडू ठरला होता.
विराटपुर्वी केथ स्टॅकपोल (१९७२), सर व्हिव्हियन रिचर्ड (१९८२, १९८५ ते ८८), जावेद मियाॅंदाद (१९८९), ब्रायन लारा (१९९४-९६), सचिन तेंडूलकर (१९९८, २००१ ते २००२), जॅक कॅलिस (२००५), रिकी पाॅंटींग (२००५ ते २००७) आणि हशिम आमला (२०१३) हे खेळाडू एकाचवेळी कसोटी आणि वनडेत अव्वल स्थानी आले होते. केवळ सचिन तेंडूलकर आणि सर व्हिव्हियन रिचर्ड यांनी असा पराक्रम दोन वेळा केला आहे.
अशी कामगिरी करणारा पॉन्टिंग जगातील एकमेव खेळाडू-
२००५-२००६ या काळात रिकी पॉन्टिंग क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल स्थानी होता. त्याने डिसेंबर २००५ ते जानेवारी २००६मध्ये हा पराक्रम केला होता. तेव्हा तो केवळ दोन टी२० सामने खेळला होता आणि त्यात त्याने ९८ धावा केल्या होत्या.
त्यावर्षी नुकतेच टी२० क्रिकेट सुरु झाले होते आणि पॉन्टिंगने पहिल्याच सामन्यात नाबाद ९८ धावांची खेळी केली होती. अन्य प्रकारात तर तो अव्वल होताच. त्याचमुळे तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एकाचवेळी अव्वल स्थानी आला होता.
कारकिर्दीत एकदा तरी कसोटी, टी२० आणि वनडेत अव्वल-
पॉन्टिंगचाच देशबांधव आणि समकालीन खेळाडू मॅथ्यू हेडनसुद्धा तिन्ही प्रकारात अव्वल स्थानी आला आहे परंतु तो वेगवेगळ्या महिन्यात ही कामगिरी साधू शकला आहे. याबरोबर विराटही कारकिर्दीत एकादातरी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.
अन्य वाचनीय लेख-
– असा आहे विश्वचषकात विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या ट्राॅफीचा इतिहास
– क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चा झालेली ती शुन्य धावेची खेळी
– खेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम…
– …तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!