---Advertisement---

१९ वर्षांखालील विश्वचषकात अशी हॅट्रिक करणारा भारत पहिलाच संघ

On: बुधवार, फेब्रुवारी 5, 2020 8:24 PM
---Advertisement---

पोचेफस्टरूम। दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात मंगळवारी(4 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील पाकिस्तान संघात (India vs Pakistan In Under-19 World Cup) उपांत्य (Semi Final) सामना पार पडला. हा सामना भारताने 10 विकेट्सने (Won By 10 Wickets) जिंकला. तसेच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला.

त्यामुळे  भारतीय संघ हा 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश करणारा एकमेव संघ ठरला आहे.

यापूर्वी 2018ला झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाने कर्णधार पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) नेतृत्वाखाली उपांत्य सामन्यात पाकिस्तानलाच पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. तसेच अंतिम सामन्यात ऑस्टेलियावर विजय मिळवत चौथ्यांदा विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले होते.

तसेच त्याआधी 2016 सालच्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाने कर्णधार इशान किशनच्या (Ishan Kishan) नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र त्यावेळी अंतिम सामन्यात विंडीज संघाकडून पराभूत झाल्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

यावेळी 2020च्या 19 वर्षाखालील विश्वचषकात भारताला पाचव्यांदा विजेतेपद मिळविण्याची संधी आहे. भारताने यापूर्वी 2000, 2008, 2012 आणि 2018 यावर्षी 19 वर्षांखालील विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे.

भारताने अंतिम सामने खेळलेले 19 वर्षांखालील विश्वचषक –

2000 – कर्णधार मोहम्मद कैफ (विजयी)
2006 – कर्णधार रविकांत शुक्ला. (उपविजयी)
2008 – कर्णधार विराट कोहली (विजयी)
2012 – कर्णधार उन्मुक्त चंद (विजयी)
2016 – कर्णधार इशान किशनच्या (उपविजयी)
2018 – कर्णधार पृथ्वी शॉ (विजयी)
2020 – कर्णधार प्रियम गर्ग (?)

https://twitter.com/Maha_Sports/status/1224989614772908032

https://twitter.com/Maha_Sports/status/1224974135240998912

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---