भारताने एशियन गेम्स 2023मध्ये आपले शानदार प्रदर्शन कायम ठेवले आहे. अशात भारतासाठी शनिवारचा (दि. 07 ऑक्टोबर) दिवस खूपच खास ठरला. भारताने महिला कबड्डी खेळात सुवर्ण पदक जिंकत खास कीर्तिमान रचला आहे. खरं तर, आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये भारतीय महिलांनी कबड्डीच्या अंतिम सामन्यात चीनी ताईपेविरुद्ध 26-25च्या अंतराने दणदणीत विजय मिळवला.
हे एशियन गेम्स 2023 (Asian Games 2023) मधील भारताचे 100वे पदक (Indian 100th Medal) ठरले. विशेष म्हणजे, हे भारताचे 25वे सुवर्ण पदक ठरले. यामुळे हे पदक खूपच खास असल्याचे मानले जात आहे. भारताने आजपर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कधीच 100 पदके जिंकली नव्हती. मात्र, या स्पर्धेत पदकांचे शतक करण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
AND THAT IS MEDAL #100 FOR 🇮🇳!!!
HISTORY IS MADE AS INDIA GETS ITS 100 MEDAL AT THE ASIAN GAMES 2022!
This is a testament to the power of dreams, dedication, and teamwork of our athletes involved in the achievement of #TEAMINDIA!
Let this achievement inspire generations to… pic.twitter.com/EuBQpvvVQ3
— SAI Media (@Media_SAI) October 7, 2023
अंतिम सामन्याचा आढावा
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत विरुद्ध चीनी ताईपे संघात खेळल्या गेलेल्या महिला कबड्डीच्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर हा सामना खूपच रोमांचक ठरला. दोन्ही संघांमध्ये हा खूपच नजीकचा सामना ठरला. या सामन्यात कधी भारताने, तर कधी चीनी ताईपेने आघाडी घेतली होती. भारताने सामन्यात दमदार सुरुवात केली. भारताने सुरुवातीलाच आघाडी घेतली होते, पण नंतर भारतीय महिला संघ बचावात्मक खेळ करताना आपली आघाडी गमावण्यास सुरुवात केली. पहिल्या हाफनंतर भारतीय महिला संघ 14-9ने आघाडीवर होता.
INDIA
100 medals ✅
25 Gold ✅India win GOLD medal in Women Kabaddi after beating Chinese Taipei 26-24 in a thrilling Final.
Historic Golden GOLD for India as it gets India 100th medal overall & 25th Gold #AGwithIAS #IndiaAtAsianGames #AsianGames2022 pic.twitter.com/2zp2Nq0rCd
— India_AllSports (@India_AllSports) October 7, 2023
दुसऱ्या हाफचा रोमांच
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाही भारताने आपली आघाडी कायम ठेवली. तसेच, एकेवेळी 16-9 असणाऱ्या आघाडीसह भारताने चीनी ताईपेला मागे टाकले. मात्र, इथून चीनी ताईपेने पुनरागमन करत भारताची आघाडी खूपच कमी केली. त्यांनी भारतीय महिला संघाच्या बचावात्मक खेळातील चुकांचा फायदा घेतला आणि सामन्यात पुनरागमन करत 14-16 असा स्कोर केला. इथे सामन्याने खूपच रोमांचक वळण घेतले. एकेवेळी चीनी ताईपेने या सामन्यात आघाडी घेतली होती, पण अंतिम वेळेपर्यंत या सामन्यात भारताने पुन्हा आघाडी घेतली. तसेच, ही आघाडी पुन्हा कमी होऊ दिली नाही. तसेच, शेवटी हा सामना आपल्या नावावर केला.
आता भारताच्या 100 पदकांनंतर सोशल मीडियावर कौतुकाचा, अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. (india creates history in asian games 2023 women kabaddi gives india its 100th medal by winning gold)
हेही वाचा-
सुवर्ण सकाळ! एशियन गेम्समध्ये भारताच्या Jyothi Vennamने तिरंदाजीत जिंकलं Gold Medal
BREAKING: चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने एशियन गेम्समध्ये केला सुवर्णपदकावर कब्जा, जपानचा उडवला धुव्वा