2024 मध्ये इंग्लंडशिवाय भारतीय संघ श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांशी खेळणार आहे. अद्याप बीसीसीआयने पूर्ण वेळापत्रक जाहीर केले नसले तरी जूनपर्यंत भारतीय संघ कोणत्या संघांविरुद्ध खेळणार हे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. सध्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी खेळायची आहे. यानंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीवर 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर ही मालिका 11 मार्चपर्यंत खेळवली जाणार आहे. या कालावधीत दोन्ही संघ 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेच्या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टी20 सामन्यांची मालिका सुरू होईल. या मालिकेनंतर आयपीएलचे आयोजन करण्यात येणार आहे. आयपीएलनंतर टी20 विश्वचषक 2024 खेळवला जाणार आहे. टी20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे.
टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघ इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासोबत मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केले नसले तरी वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यांत भारत श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासोबत मालिका खेळणार असल्याचे FTP चक्रावरून स्पष्ट झाले आहे. सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. (Team India will play Test series before IPL, then T20 World Cup)
हेही वाचा
आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाचं धक्कादायक विधान; म्हणाला, ‘सचिन हा एकमेव फलंदाज होता जो…’
टीम इंडिया क्रिकेट जगतात नवीन चोकर्स आहे का? पाहा माजी क्रिकेटपटूने काय उत्तर दिले