सध्या भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये टी20 मालिका खेळवली जात आहे. या संघामध्ये दुसरा टी20 सामना रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) खेेळला गेला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकूण क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय संघाने फलंदाजी करताना एक विलक्षण गोष्ट केली, जी की भारतीय क्रिकेटच्या इतिहसात या आधी फक्त एकदाच घडली आहे. ही विलक्षण गोष्ट म्हणजे दोनही सलामीवीर डावखुरे असण्याची.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी20 सामना खेळवला गेला. या सामन्यात नाणेफकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला. न्यूझीलंडने भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. फलंदाजीसाठी उतरण्याआधी सर्वांना हेच वाटले असेल की भारताकडून एक उजव्या हाताचा फलंदाज आणि एक डाव्या हाताचा फलंदाज सलामीसाठी उतरेल. मात्र, चाहत्यांना एक वेगळेच दृष्य बघायला मिळाले. भारतीय संघाने सलामीसाठी दोनही फलंदाज डावखुरेच पाठवले. भारतीय संघाने सलामीसाठी रिषभ पंत (Rishabh Pant) आणि इशान किशन (Ishan Kishan) या दोन डावखुऱ्या फलंजाला पाठवण्यात आलेले.
सलामीला दोनही डावखुरे फलंदाज उतरवण्याची भारतीय संघाची ही पहिली वेळ नाही. या आधी देखील भारतानेे ही विलक्षण गोष्ट केली आहे. 2012च्या आयसीसी वर्ल्ड टी20 स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघात साखळी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना दोन डावखुरे सलीमीवीर मैदानात उतरवले होते. भारताच्या डावाची सुरुवात गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि इरफान पठाण (Irfan Pathan) या दोघांनी केली होती. या सामन्यात गंभीरने 17 तर इरफानने 31 धावांची खेळी केली होती.
सध्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने सलामीसाठी पंत आणि किशन या दोघांना पाठवले.
या सामन्यात भारताची सुरुवात निराशजनक झाली. पंत अवघ्या 6 धावा करत झेलबाद झाला आणि किशनने 31 चेंडूत 36 धावा केल्या. मात्र, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav ) याने शतकी खेळी करत भारताची खिंड लढवली आणि भारताला निर्धारीत 20 षटकात 191 या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. (India Cricket Team has opened with two south paw batsman for second time in Indian Cricket History)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संजूबाबत अश्विनची भविष्यवाणी ठरली खरी! भारताकडून पंतच्या आधी टी20 पदार्पण करूनसुद्धा दुर्लक्षित
रोहित- विराटच्या ‘त्या’ नकोशा विक्रमाच्या यादीत पंतही बसला मांडी घालून, बनला दुसराच खेळाडू