---Advertisement---

अखेर मुहूर्त लागला! तब्बल ६ वर्षांनंतर भारतीय संघ जाणार ‘या’ देशाच्या दौऱ्यावर

On: शनिवार, जुलै 9, 2022 9:16 PM
Team-India
---Advertisement---

भारतीय संघ पुढच्या महिन्यात जिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. संघाला या दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. भारतीय संघाचा हा दौरा १८ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे सांगितले गेले आहे. बीसीसीआयकडून याविषयी अद्याप अधिकृत घोषणा केली गेली नाहीये. परंतु जिम्बाब्वे क्रिकेटचे टेक्निकल डायरेक्टर लालचंद राजपूत यांनी याविषयी पुष्टी केली आहे.

जिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील या एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने हरारेमध्ये खेळले जाणार, अशीही माहिती समोर आली आहे. भारतीय संघाचा हा दौरा आयसीसी सुपर लीगचा भाग असणार आहे. हा दौरा यासाठीही महत्वाचा आहे, कारण पुढच्या वर्षी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार आहे. या दौऱ्यात मिळालेले गुण पुढच्या वर्षी विश्वचषकाच्या क्वालिफिकेशनसाठी संघाच्या उपयोगी येतील. परंतु भारताने विश्वचषकासाठी आधीच पात्रता मिळवली आहे, हा दुसरा भाग.

जिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे टेक्निकल डायरेक्टर लालचंद राजपूत यांनी भारताच्या या दौऱ्याविषयी माहिती दिली. ते म्हणाला की, “आम्ही भारताविरुद्धच्या मालिकेत यजमानपद भूषवताना आनंदी आहोत. आम्हाला एका प्रतिस्पर्धी आणि अविस्मरणीय मालिकेची अपेक्षा आहे.”

दरम्यान, भारतीय संघाचा हा मागच्या ६ वर्षांतील पहिला जिम्बाब्वे दौरा आहे. यापूर्वी एमएस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघ २०१६ मध्ये जिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. तेव्हा संघाने तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली होती. यावेळी मात्र मुख्य संघ टी-२० मालिका खेळू शकणार नाही. कारण २७ ऑगस्टपासून श्रीलंकेत टी-२० आशिया चषक खेळला जाणार आहे. अशात बीसीसीआय दोन वेगवेगळ्या संघाची निवड करू शकते.

त्याव्यतिरिक्त आगामी काळात भारतीय संघाला इंग्लंड आणि वेस्ट इंडीजविरुद्ध प्रत्येकी तीन-तीन सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. परंतु या दोन्ही मालिका सुपर लीगचा भाग नाहीत. संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर टी-२० मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

रविंद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्जचं ‘ब्रेकअप’? फ्रँचायझीकडून मोठं विधान आलं पुढे

Second T20 | भारतीय संघात वरिष्ठांचे पुनरागमन, इंग्लंडने नवा भिडू उतरवला मैदानात; पाहा प्लेइंग इलेव्हन

दुसऱ्या टी२०पूर्वी कर्णधार बटलरची संघासोबत ‘खास मीटिंग’, खेळाडूंना सांगितला विजयाचा मंत्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---