महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Womens Aisan Champions Trophy 2024) फायनल सामन्यात चीनचा धुव्वा उडवून भारताने ट्राॅफीवर नाव कोरले. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारतीय संघाने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. भारताकडून सामन्यातील एकमेव गोल दीपिका कुमारीने (Deepika Kumari) 31व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरमध्ये केला.
भारत विरूद्ध चीन (India vs Chin) संघात झालेल्या फायनल सामन्यात पहिले 2 क्वार्टर गोल 0 राहिले, म्हणजेच हाफ टाईमपर्यंत कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. मात्र तिसऱ्या क्वार्टरला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यामध्ये दीपिका कुमारीने शानदार गोल केला.
या स्पर्धेपूर्वीच सलीमा टेटेकडे (Salima Tete) भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करताना तिने भारतीय संघाला चॅम्पियन बनवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चीनने शेवटच्या क्षणापर्यंत गोल करण्याचा अथक प्रयत्न केला. त्यांनी शेवटच्या क्षणी मैदानावरील 11व्या खेळाडूसह गोलकीपरला बदलून दिले. असे असूनही चीनच्या संघाला एकही गोल करता आला नाही.
भारताने यापूर्वी 2 वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. 2016 मध्ये भारताने एका रोमांचक सामन्यात चीनचा 2-1 असा पराभव केला होता. 2023 मध्ये भारतीय संघाने विजेतेपदाच्या सामन्यात जपानचा 4-0 असा पराभव करून ट्रॉफीवर नाव कोरले होते. गेल्या 5 स्पर्धेत भारताने तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे, तर दुसरीकडे चीनने इतिहासात तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र यावेळीही चीनच्या हाती निराशाच लागली.
महत्त्वाच्या बातम्या-
“असा कोणीही नाही ज्याची…” रोहित शर्माबद्दल माझी भारतीय क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य!
अलविदा नदाल…! 22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन त्याच्या शेवटच्या सामन्यात घरच्या चाहत्यांसमोर हरला
आयसीसी क्रमवारीत तिलक वर्माची गरुड झेप; हार्दिक पांड्याला देखील बंपर फायदा