इंग्लंड आणि भारत क्रिकेट संघात ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. ही मालिका दोन्ही संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सध्या या मालिकेबद्दल अनेक आजी-माजी क्रिकेटपटू आपली मतं व्यक्त करत आहेत. अनेकांनी विविध सल्ले देखील दोन्ही संघांना दिले आहेत. अनेक दिग्गजांनी असाही अंदाज व्यक्त केला आहे की या मालिकेत गोलंदाजांची भुमिका महत्त्वाची राहाणार आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने देखील या मालिकेसाठी भारतीय संघात कोण-कोणत्या गोलंदाजांचा समावेश असावा याबद्दलचे मत त्याच्या यूट्यूब चॅनलवरून मांडले आहे.
त्याच्या मते इंग्लंड विरुद्ध भारतीय संघाने अंतिम ११ जणांच्या संघात ५ गोलंदाजांचा समावेश करावा. ज्यात दोन फिरकीपटू आणि तीन जलदगती गोलंदाजांचा समावेश असावा. इंग्लंडमधील वातावरण पाहता गोलंदाजांना चेंडू ग्रीप आणि टर्न करण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे भारतीय संघात फिरकीपटू म्हणून आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना घ्यावे. तसेच हे दोघे फलंदाज म्हणून देखील खेळू शकतात. त्यामुळे भारतीय फलंदाजी आणखी मजबूत होईल.
त्याचबरोबर इंग्लंडचे मैदान जलदगती गोलंदाजांना पूरक असे मैदान आहे. इथल्या वातावरणाचा फायदा भारतीय जलदगती गोलंदाज घेऊ शकतात. म्हणून अशावेळी भारतीय संघाने जलदगती गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा यांना स्थान द्यावे. यांना गोलंदाजीचा भरपूर अनुभव आहे व याचा फायदा ते इंग्लंडसारख्या मैदानात घेऊ शकतात.
तसेच आकाश चोप्राने असेही सुचवले की रिषभ पंतने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी.
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंगघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्वाच्या बातम्या –
–कौतुक तर होणारच! भारतीय हॉकी महिला संघाची ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनीही थोपटली पाठ
–सेमीफायनलसाठी भारताचे हॉकी संघ सज्ज; जाणून घ्या कधी आणि केव्हा होणार सामने