रविवारी (08 सप्टेंबर) रोजी झालेल्या एका कार्यक्रमात राहुल द्रविड बोलताना म्हणाला की, भारतीय क्रिकेट वाढत्या टॅलेंट पूलमुळे एक ‘अत्यंत शक्तिशाली’ म्हणून विकसित झाले आहे आणि आता ते देशाच्या अगदी दूरच्या कानाकोपऱ्यातही पसरले आहे. टी20 विश्वचषकातील भारताच्या विजयाचा शिल्पकार असलेल्या द्रविडने सांगितले की, राष्ट्रीय संघातील शहरातील क्रिकेटपटूंच्या वर्चस्वाचा जुना ट्रेंड संपवण्यासाठी मजबूत क्लब क्रिकेट संस्कृतीचा खूप संबंध आहे.
माउंट जॉय क्लबच्या 50 व्या वर्षाच्या सेलिब्रेशनच्या वेळी भारताचा माजी प्रशिक्षक म्हणाला, ‘जर तुम्ही आज भारतीय क्रिकेटकडे पाहिले तर भारतीय क्रिकेट खूप मजबूत आहे. ते खूप शक्तिशाली आहे. याचं एक मोठं कारण म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून टॅलेंट येत आहे’.
“मला वाटतं तुम्ही जीआर विश्वनाथच्या काळात किंवा जेव्हा मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात करत होतो, तेव्हा बहुतेक प्रतिभा मोठ्या शहरांतून किंवा निवडक राज्यांतून येत होती, पण सध्याच्या युगात भारतीय क्रिकेटमध्ये तुम्हाला ते सर्वत्र संपूर्ण देशातून खेळाडू येताना दिसत आहेत.
द्रविडने देशांतर्गत क्रिकेटमधून भारतीय क्रिकेटच्या वाढलेल्या पातळीचे उदाहरण दिले. तो म्हणाला, ‘तुम्ही आता रणजी ट्रॉफीच्या पातळीवर बघा, तुम्ही कोणत्याही संघाला हलक्यात घेऊ शकत नाही.’ तो म्हणाला, ‘मी कोणाचाही अनादर करत नाही, पण जेव्हा मी खेळायला सुरुवात केली, तेव्हा तामिळनाडू दक्षिण झोनमध्ये होते इतर संघांविरुद्ध थोड्या आत्मविश्वासाने खेळायचे पण आता तुम्ही ते करू शकत नाही. प्रत्येक संघ मजबूत आहे.
51 वर्षीय राहुल द्रविडने भारतासाठी एकूण 164 कसोटी, 344 एकदिवसीय आणि एकमात्र टी-20 सामना खेळला आहे. द्रविडने कसोटीत 13288 धावा, एकदिवसीय सामन्यात 10889 धावा आणि टी20 मध्ये 32 धावा केल्या आहेत.
हेही वाचा-
प्रतिष्ठेच्या यूएस ओपनला मिळाला नवा चॅम्पियन! अमेरिकन खेळाडूचं स्वप्न भंगलं
IND vs BAN: पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये स्थान गमावलेले 3 दुर्दैवी खेळाडू
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियासोबत दिसणार जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज, गंभीरशी खास नातं