---Advertisement---

रिंकू सिंगच्या रूपाने भारताला मिळाला नवा ‘फिनिशर’; पहिल्याच सामन्यात मोडला धोनीचा मोठा विक्रम!

On: गुरूवार, जानेवारी 22, 2026 5:16 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. शेवटी फलंदाजीला येऊन तुफान फटकेबाजी करून तो संघाच्या विजयात मोलाचं योगदान द्यायचा. धोनीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला असा फलंदाज मिळालेला नाही, जो शेवटी फलंदाजीला येऊन वेगाने धावा करेल. पण रिंकू सिंग ही जागा भरून काढण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात फलंदाजी करताना त्याने शेवटी फलंदाजीला येऊन नाबाद 44 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने एमएस धोनीच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. डावाची सुरूवात करताना अभिषेक शर्माने तुफान फटकेबाजी करत 84 धावा केल्या. तर शेवटी रिंकू सिंगने 20 चेंडूत नाबाद 44 धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने 4 चौकार आणि 3 षटकार खेचले.

पाहिल्या डावातील शेवटच्या षटकात फलंदाजी करताना त्याने 2 षटकार खेचले. यासह तो भारतीय संघाकडून 20 व्या षटकात फलंदाजी करताना सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या विक्रमात त्याने एमएस धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रिंकू सिंगने आपल्या छोट्याशा टी20 कारकिर्दीत 20 व्या षटकात फलंदाजी करताना 12 षटकार खेचले आहेत. तर एमएस धोनीच्या नावे देखील 12 षटकार खेचण्याची नोंद आहे. या यादीत स्फोटक फलंदाज हार्दिक पंड्या अव्वल स्थानी आहे. हार्दिकच्या नावे 20 व्या षटकात फलंदाजी करताना 15 षटकार मारण्याची नोंद आहे. मुख्य बाब म्हणजे रिंकू सिंगने केवळ 37 चेंडूत 12 षटकार मारले आहेत. तर एमएस धोनीने 132 चेंडूत 12 षटकार खेचले होते. अव्वल स्थानी असलेल्या हार्दिक पंड्याने 91 चेंडूत 15 षटकार मारले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---