भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना माहिती आहे की, भविष्यात भारतीय संघात बदल घडवून आणण्याचा कठीण कालावधी भारताची वाट पाहत आहे. परंतू, युवा प्रतिभावान खेळाडूंसह काम केल्यानंतर, त्यांना वाटत आहे की, भारतीय संघ त्यास सामोरे जाण्यास सक्षम आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या क्षणी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळत राहतील. परंतू, जेव्हा ते त्यांच्या कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात असतील तेव्हा तेथे बदल करावे लागतील.
माजी निवडकर्ता विक्रम राठोड यांनी पीटीआयला एका विशेष मुलाखतीत सांगितले की, “रोहित आणि विराट यांसारख्या क्षमतेच्या खेळाडूंची जागा घेणे कधीही सोपं नाही. परंतू, भविष्यात आमच्याकडे अद्याप कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पोहोचण्यासाठी काही वर्षे आहेत.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “मला आशा आहे की रोहित-विराटच्या अंतिम कारकीर्दीपर्यंत शुबमन गिल, रिषभ पंत, यशस्वी जायसवाल, ध्रुव जुरेल हे युवा खेळाडू स्वत: ला मजबूत करतील. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यर, लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्या हे खेळाडू आता स्वत: जबाबदारी घेण्यासाठी तयार आहेत.”
गेल्या तीन वर्षांत राठोड हे राहुल द्रविडसाठी एक उत्कृष्ट सल्लागार राहिले आणि जेव्हा ते म्हणतात की रिंकू सिंह एक चांगला कसोटी फलंदाज बनेल, तेव्हा हे विधान जरा वेगळे दिसते. ते म्हणाले, “जेव्हा मी त्याला (रिंकू) नेटमध्ये फलंदाजी करताना पाहतो तेव्हा मला असं कोणतंही तांत्रिक कारण दिसत नाही. मला वाटते की त्यानं टी20 क्रिकेटमध्ये एक उत्कृष्ट फिनिशर म्हणून आपली छाप बनवली आहे. परंतू, जर आपण त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील रेकाॅर्ड पाहिला तर, त्याची फलंदाजी सरासरी 50 पेक्षा जास्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वीच स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना ‘किंग’ कोहलीनं दिल्या शुभेच्छा…!
रिंकू सिंहबाबत बॅटिंग कोचची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, “त्याला कसोटीत संधी मिळाली तर…”
बीसीसीआयचे होणार कोट्यवधींचे नुकसान? ‘या’ कामांवर बंदी आणू शकते भारत सरकार