भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय इतिहासातील हा महान पराक्रम साध्य करण्यापासून फक्त एक विजय दूर आहे, जो ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या भयानक संघांना आजपर्यंत करता आलेला नाही. 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सामना जिंकून भारत हा चमत्कार करू शकतो. श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात हे अनोखे शतक झळकावता आले असते, पण सामना बरोबरीत सुटला आणि संधी थोडक्यात हुकली.
खरं तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय नोंदवण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर आहे. भारताने आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या 169 एकदिवसीय सामन्यांमध्ये 99 विजय नोंदवले आहेत. भारताने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना जिंकल्यास या संघाविरुद्ध 100 विजयांची नोंद होईल आणि अनोखे शतक ठोकणारा तो जगातील पहिला संघ बनेल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारखे धोकादायक संघही या बाबतीत भारताच्या मागे आहेत.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये 96 विजय नोंदवले आहेत, जे भारतापेक्षा कमी आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत खेळलेल्या 142 सामन्यांमध्ये 96 विजयांची नोंद केली आहे. त्याचवेळी, श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या 157 एकदिवसीय सामन्यांमध्ये 93 विजयांसह पाकिस्तान यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ टॉप-10 मध्येही नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे, ज्याने इंग्लंड आणि भारताविरुद्ध अनुक्रमे 88 आणि 84 एकदिवसीय सामने जिंकले आहेत.
वनडेमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय
भारत विरुद्ध श्रीलंका – 99 विजय
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड- 96 विजय
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका- 93 विजय
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड- 88 विजय
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत – 84 विजय
श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा
हेही वाचा-
सरफराज खानकडे मुंबई क्रिकेट संघाचं नेतृत्व, एमसीएनं दिली मोठी जबाबदारी
IND VS SL: ‘करो या मरो’ सामन्यात श्रीलंकेनं जिंकला टाॅस, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात गेला नाही तर? आयसीसीचा ‘प्लॅन बी’ तयार





