बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी कायम आहे. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपली ताकद दाखवणाऱ्या भारतीयांनी आज ऍथलेटिक्समध्येही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. येथे दोन भारतीय खेळाडूंनी लांब उडीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. मुरली श्रीशंकर आणि मोहम्मद अनीस याहिया यांनी पात्रता फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम १२ मध्ये प्रवेश केला आहे.
मुरली श्रीशंकरने पहिल्याच प्रयत्नात ८.०५ मीटर लांब उडी मारून अंतिम फेरीतील आपले तिकीट निश्चित केले होते. कारण स्वयंचलित पात्रतेसाठी ८ मीटरचे गुण निश्चित करण्यात आले होते. पात्रता फेरीत ८ मीटरपेक्षा जास्त उडी मारणारा मुरली एकमेव खेळाडू होता. या कामगिरीमुळे श्रीशंकरने लांब उडीत पदकाच्या आशा वाढवल्या आहेत.
https://twitter.com/Media_SAI/status/1554353464712409088?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1554406122798268416%7Ctwgr%5E14be04a635fa48372efd09d9e4e0192685ff2af5%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fcommonweath-games-2022-murali-sreeshankar-and-muhammed-anees-yahiya-qualifies-for-the-final-2182753
या पात्रता फेरीत, मोहम्मद अनीसने ७.६८ मीटरच्या सर्वोत्तम गुणांसह अंतिम १२ मध्ये प्रवेश मिळवला. याहियाला पहिल्याच प्रयत्नात केवळ ७.४९ मीटरपर्यंत पोहोचता आले. त्याने दुसऱ्या प्रयत्नात ७.६८ मीटर उडी मारली आणि तो आपल्या गटात तिसरा आला. एकूण, १२ अंतिम स्पर्धकांमध्ये तो आठव्या स्थानावर राहिला.
दरम्यान, राष्ट्रकूल स्पर्धेत पाचव्या दिवसापर्यंत भारतीय खेळाडूंनी एकुण १० पदके मिळवली आहेत. ज्यामध्ये ४ सुवर्ण ३ रौप्य आणि ३ कांस्य पहकांचा समावेस आहे. याशिवाय भारताला स्पर्धेच्या शेवटीपर्यंत आणखी काही पदके मिळवण्याची संधी उपलब्ध आहे. शिवाय स्पर्धेत पहिल्यांदाच सामील केलेल्या महिला क्रिकेटमध्ये सुद्धा भारतीय संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहे. भारताच्या महिला संघाला ३ ऑगस्ट रोजी बार्वाडोस विरुद्ध होणारा सामना जिंकल्यास थेट उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे भारतीय महिला संघ देखील आपले राष्ट्रकूल स्पर्धेतील पहिले पदक मिळवण्यास उत्सुक असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अल्टीमेट खो-खो पहिल्या हंगामाच्या कार्यक्रमाची घोषणा
न्यूझीलंडच्या खेळाडूने उलघडले लाजिरवाणे गुपित, सत्य बाहेर आल्याने सर्वत्र खळबळ
बाबो! झिम्बाब्वेचा पठ्ठ्या युवराजचा रेकॉर्ड मोडता-मोडता राहिला, एका षटकात कुटल्या ‘एवढ्या’ धावा