भारत-इंग्लंड (India vs England) संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी20 सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगला आहे. दरम्यान भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर विजयासाठी 248 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
इंग्लंड कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) टाॅस जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 9 गडी गमावून 247 धावा केल्या. भारतासाठी युवा प्रतिभावान खेळाडू अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) 54 चेडूत सर्वाधिक 135 धावा केल्या. दरम्यान त्याने 7 चौकारांसह 13 षटकार लगावले. भारतासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने धमाकेदार सुरूवात केली. संजू सॅमसन बाद झाल्यानंतर अभिषेकने आक्रमक कामगिरी सुरूच ठेवली.
शिवम दुबे (30 धावा), तिलक वर्मा (24 धावा), संजू सॅमसन (16 धावा) आणि उपकर्णधार अक्षर पटेल (15 धावा) यांच्या जोरावर भारतीय संघ 247 धावा करण्यात यशस्वी ठरला. या सामन्यात अनेक रेकाॅर्ड्स तुटले तर अनेक नवे रेकाॅर्ड जोडले गेले.
इंग्लंडसाठी ब्रायडन कार्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर मार्क वूड 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. जोफ्रा आर्चर, जेमी ओव्हरटन, फिरकीपटू आदिल रशिदने प्रत्येकी 1-1 विकेट आपल्या नावावर केली. आता इंग्लंडचे फलंदाज 248 धावांचे मोठे आव्हानाचा पाठलाग करण्यात यशस्वी ठरतील का? हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरेल.
पाचव्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-
भारत- संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती
इंग्लंड- फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड
महत्त्वाच्या बातम्या-
जाणून घ्या कोण आहे गोंगाडी त्रिशा? जी ठरली अंडर19 महिला टी20 वर्ल्डकपची सर्वोत्तम खेळाडू
IND vs ENG; अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! झळकावले तुफानी शतक
गोंगाडी त्रिशाने घडवला इतिहास; रचला ‘हा’ नवा विक्रम